कोयना, महाबळेश्वरला पावसाचा जोर : धरणात 40.73 TMC पाणीसाठा

– विशाल वामनराव पाटील
सातारा जिल्ह्याला आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. गेल्या 24 तासात 5.17 टीएमसी पाणीसाठा वाढला असून सध्या धरणात 40.73 टक्के पाणीसाठा आहे. कोयना परिसरात जोर कमी झाला असला तरी सध्या धरणात प्रतिसेंकद 38 हजार 923 क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे. दरड प्रवण क्षेत्रात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भेट देत आढावा घेतला असून पाटण प्रशासनाला सूचना केल्या.
जिल्ह्याला गेले दोन दिवसापूर्वी मंगळवारी जोरदार झोडपले असून बुधवार व गुरूवारी काहीसा पाऊस अोसरला आहे. परंतु, सध्या कोयना नदीपात्र दुथडी भरून वाहू लागले आहे. तर तांबवे बंधाऱ्याला पाणी घासून गेले होते, निसरे बंधाऱ्याजवळही हीच परिस्थिती पहायला मिळाली.मात्र, अद्याप मूळगाव पुलावरून पाणी गेले नाही. शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची अपेक्षा आहे.
कोयनेत 40. 73 टीएमसी पाणीसाठा…
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडत असल्याने कोयना धरणातील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 40. 73 टीएमसी पाणीसाठा होता. गेल्या 24 तासात कोयनेला- 84 मिलीमीटर, नवजा- 95 मिलीमीटर व महाबळेश्वरला- 103 मिलीमीटर पाऊस पडला. त्याचबरोबर आतापर्यंत कोयनेला- 1644, नवजा- 2331 आणि महाबळेश्वरला- 2332 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.