ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

सुपने- तांबवे जिल्हा परिषद गट : युवा उद्योजक स्वप्नील पवार निवडणूक रिंगणात उतरणार?

कराड : सुपने तांबवे जिल्हा परिषद गटातून युवा उद्योजक स्वप्नील सर्जेराव पवार निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. स्वप्निल पवार हे राष्ट्रवादी शरद पवार गटातून इच्छुक असून त्यांनी हालचाली सुरू केले आहेत.

सुपने तांबवे जिल्हा परिषद गट सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाला आहे. या ठिकाणी सर्वच पक्षातून अनेक जण इच्छुक आहेत. कराड दक्षिण आणि पाटण विधानसभा मतदारसंघातील नेत्यांवर या ठिकाणी उमेदवार कोण द्यायचा असा पेचप्रसंग समोर आहे. या जिल्हा परिषद गटावर स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांच्या गटाचे प्राबल्य राहिले आहे. त्यांना विरोधक म्हणून नेहमीच राष्ट्रवादी अनेकदा पाहायला मिळाली. मात्र राष्ट्रवादीतील फुटी नंतर येथील राजकीय समीकरणे बदललेली पाहायला मिळत आहेत.

तांबवे सुपने जिल्हा परिषद गटातून युवा उद्योजक सुपने तांबवे गटातून स्वप्नील सर्जेराव पवार शरद पवार गट तून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी ते आता राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटातील नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. तसेच त्यांना नेत्यांकडून आदेश मिळाल्यानंतर ते आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close