kota acadamy karad
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यशैक्षणिकसातारा

निर्भया पथकाची कारवाई : कराडात मुलींची छेड काढणाऱ्या रोड रोमियोवर पोक्सोचा गुन्हा दाखल

कराड | कराड येथील कॉलेज परिसरामध्ये एसटी स्टँड जवळ कॉलेजच्या तरुणी जात असताना त्यांचा सातत्याने पाठलाग करणाऱ्या दोघांवर निर्भया पथकाने कारवाई केली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून गणेश सदाशिव घाडगे व सागर बबन पवार (दोघे रा. हजारमाची, ता. कराड) यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, कराड येथील कॉलेज परिसरामध्ये तसेच एसटी स्टँड जवळ कॉलेजच्या तरुणी जात असताना त्यांना सातत्याने पाठलाग करून इशारा देऊन त्रास दिला जात होता. याबात निर्भया पथकातील पोलिस अमलदार दीपा पाटील यांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून छेड काढणाऱ्या दोन्ही तरुणांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कराड येथील पोलीस उपनिरीक्षक श्री. पुजारी, महिला अंमलदार दीपा पाटील, प्रीतमा कांबळे, स्वप्नील साबळे व अमोल फल्ले यांनी केली आहे.

मुली व महिलांना त्रास देणाऱ्यावर कडक कारवाई होणार : अमोल ठाकूर
तक्रार दिल्याबद्दल सदर मुलीच्या धाडसी कृत्याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी त्यांची कौतुक केले असून सर्व मुली व महिलांनी निडरपणे पुढे येऊन न घाबरता निर्भया पथकास तक्रार करावी, असे आवाहन केले आहे. कॉलेज परिसरात तसेच इतरत्र मुलींची छेड काढणाऱ्या रोड रोमिओंवर यापुढे देखील अशीच कडक कारवाई होणार आहे, असे देखील त्यांनी सांगितले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close