‘कराड मर्चटचा १०५० कोटीचा व्यवसाय, १२ टक्के लाभांश – कुटुंबप्रमुख सत्यनारायण मिणीयार

कराड (हॅलो न्यूज) – संस्थेने नुकत्याच संपलेल्या सन २०२५-२६ या अर्थिक वर्षात गत वर्षीच्या तुलनेत ठेव व कर्जात १७ टक्के ऐवढी प्रशंसनीय वाढ केली असुन संस्थेचा एकत्रित व्यवसाय १०५० कोटी झाला आहे. चालु वर्षी संस्थेने सर्व सभासदांच्या सहकार्याने संस्थेची गुणात्मक वाढ करीत संस्थेकडे ४२५ कोटीची कर्जे वितरीत केली आसुन गत वर्षीच्या तुलनेत वसुली कारवाई व सततचा संपर्क गतिमान ठेवल्याने नक्त एन पी ए शुन्य टक्के राखण्यात यश मिळविले आहे. सभासदांनी संस्थेवर दाखविलेल्या विश्वासामुळे मार्च २०२६ अखेर संस्थेच्या ठेवी ५८५ कोटी होत्या आजरोजी त्यामध्ये वाढ होवुन संस्थेच्या ठेवी ६२२ कोटी झाल्या असुन कर्जे ४४० कोटीची आहेत. मागील अर्थिक वर्षात संस्थेला १८ कोटी २३ लाखांचा ढोबळ नफा झाला आहे. संस्थेचे कामकाज विविध २७ शाखातुन सुरु असुन १८ शाखा स्वमालकीच्या जागेत कार्यरत आहेत. मागील अर्थिक वर्षासाठी सभासदांना १२% उच्चांकी लाभांश देत असल्याचे संस्थेचे कुटुंबप्रमुख सत्यनारायण मिणीयार यांनी सांगितले.

कराड मर्चट सहकारी क्रेडीट संस्थेची नुकत्याच संपलेल्या सन २०२५-२६ या अर्थिक वर्षाची ४० वी वार्षीक सर्वसाधारण सभा मर्चट कुटुंब प्रमुख सत्यनारायण मिणीयार यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे संस्थेचे ज्येष्ठ सभासद चंद्रकांत पवार उपस्थित होते. महिला मर्चट संस्थापिका सौ. भारती मिणीयार, संस्थेचे व्हा. चेअरमन शिवाजीराव जगताप, संचालक आनंदराव शिंदे, सुरेश पवार, डॉ. मुकुंद लाहोटी, नथमल ओसवाल, वसंतराव हुलवान, किशोर झाड, अरविंद शिंदे, राहुल मिणीयार, भास्करराव पाटील, माणिकराव पाटील, अकाश जाधव, सागर भोंगाळे, सौ. राखी चव्हाण, मॅनेजर अशोक माटेकर यांच्यासह सभासद, ठेवीदार उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे चंद्रकांत पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ सभासद दिलीप लंगडे काका यांच्या सुविचार संग्रह भाग ३ चे प्रकाशन करणेत आले. त्यांनी बोलताना संस्थेच्या स्थापने पासुनचा जडणघडणीचा अढावा घेतला. तसेच मिणीयार साहेबांचे कराड मधील शाहु महाराजाच्या पुतळा उभारणीत मोलाचे योगदान असुन शाहु महाराजांच्या कार्यातुन प्रेरणा घेवुन बहुजन हिताय, बहुजन सुखायची संकल्पना राबवत संस्थेचे काम करत आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व त्याना दिर्घायुष्य लाभो असे गौरवोद्गार काढले. पुस्तक प्रकाशना बाबत श्री. लंगडे यानी क्रतज्ञता व्यक्त केली.
संस्थेच्या चेअरमन सौ. अरुणा चव्हाण म्हणाल्या, संस्थेने सर्व सभासदांच्या सहकार्याने संस्थेची गुणात्मक वाढ करित सभासदानी संस्थेवर दाखविलेल्या अढळ विश्वासामुळे संस्थेस हे यश मिळाले आहे. चालु आर्थिक वर्षात नेहमी प्रमाणे मर्चेंट समुहाने आपले सामजिक बांधीलकीचे भान जपत जन्मानंतरचा प्रवास सुखाचा झाला. मरणानंतरचा सुध्दा प्रवास सुखाचा व्हावा, या हेतुने स्वर्गरथाची संकल्पना राबविलेली आहे. तसेच मर्चेंट वधुवर सुचक केंद्र सरु झाले असुन, सेवकांच्या हिताचा विचार करुन मर्चेंट सेवक पतसंस्थेची हि स्थापना केलेली आहे. बँकीग क्षेत्रात वेगवेगळ्या नवनविन सुविधा उदा. इंटरनेट बँकींग, मोबाई ल बँकींग, आर टी जीएस, एन ई एफ टी सेवा, लॉकर सुविधा उपलब्ध करुन दिल्या असुन. संपुर्ण शाखा सीबीएस प्रणालीचा अवलंब करित असुन नाविन्य पुर्ण अशी क्युआर कोड सुविधा उपलब्ध करुन दिली आहे त्याचा हि सर्व ग्राहकानी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे अवाहन करणेत आले आहे. सभेचे प्रास्ताविक व स्वागत संचालक डॉ. शरद क्षीरसागर यानी केले. आभार अरविंद कलबुर्गी यानी अभार मानले



