भाजपा सातारा जिल्हा महिला मोर्चाच्या सरचिटणीसपदी शिलादेवी पाटणकर

पाटण (हॅलो न्यूज) :- भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सातारा जिल्हा सरचिटणीस (महामंत्री) पदी पाटण येथील सौ. शिलादेवी धैर्यशील पाटणकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते व भाजपाच्या महिला मोर्चाच्या सातारा जिल्हाध्यक्षा सौ. तेजस्विनी संग्राम घोरपडे यांच्यासह पदाधिकार्यांच्या उपस्थितीत हे नियुक्तीपत्र त्यांना प्रदान करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा महिला मोर्चाचा पद्ग्रहण समारंभ सातारा येथे भाजपा कार्यालयात नुकताच पार पडला. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिकसह सर्वच क्षेत्रात हिरीरीने सहभाग घेणार्या, प्रत्येक सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या पाटण येथील सौ. शिलादेवी धैर्यशील पाटणकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांची भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सातारा जिल्हा सरचिटणीस (महामंत्री) पदी नियुक्ती करण्यात आली. या निवडीमुळे आपल्यावरील सामाजिक कार्याची जबाबदारी आणखीनच वाढली आहे. भाजपा पक्ष वाढवण्याबरोबरच महिलांच्या उन्नतीसाठी आपण विशेष प्राधान्य देणार आहोत. पक्षाने आपल्यावर टाकलेली जबाबदारी सर्वांना सोबत घेवून नेटाने पार पाडू, असा विश्वास सौ. शिलादेवी पाटणकर यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.
या निवडीबद्दल त्यांचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, भाजपाचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस याज्ञसेन पाटणकर, पाटण पश्चिम तालुकाध्यक्ष नंदकुमार सुर्वे, भाजना ज्येष्ठ नेते राजाभाऊ शेलार, पाटण तालुक्यातील सर्व बुध अध्यक्ष, बीएलओ, सर्व सदस्य, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले.



