क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

उसण्या पैशाच्या कारणातून पाटण तालुक्यात एकाचा खून

पाटण | तालुक्यातील मल्हारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कडववाडी येथे एकाचा उसने घेतलेल्या पाच हजार रुपयांच्या कारणातून खून झाल्याची घटना समोर आली आहे. पंडित बाबुराव चव्हाण (वय- 52, रा. कडववाडी, ता. पाटण) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अनिकेत मारूती जगदाळे (वय- 25, रा. जागळेवाडी, ता. पाटण) असे खून करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, पंडित चव्हाण याने अनिकेत यांच्याकडून 5 हजार रुपये उसने घेतले होते. उसने घेतलेले पैसे परत मागण्यासाठी अनिकेत गुरूवारी रात्री गेला होता. यावेळी पंडित याने पैसे देण्यास नकार दिल्याने अनिकेतने सुरा आणि काठीने मारहाण केली, यामध्ये पंडितचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर अनिकेत जगदाळे स्वतः मल्हारपेठ पोलीस ठाण्यात हजर झाला. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती मल्हारपेठ पोलिसांना मिळाली असून खूनाचा गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास मल्हारपेठ पोलीस करत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close