क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

कराडमधील मुजावर कॉलनीत स्फोट : 9 जखमी, 7 घरे, दुचाकीचे नुकसान

कराड | कराड शहरातील मुजावर कॉलनीत बुधवारी सकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे घराची भिंत सुमारे 25 फूट वरती उडून समोरील घराच्या पत्र्यावरती पडली. स्फोटात शरीफ मुल्ला यांच्या कुटूंबातील 9 जण जखमी झाले आहेत. स्फोट एवढा जबरदस्त होता की 7 घराच्या भिंतींचीही पडझड झाली असून घर धोकादायक बनली आहेत. या स्फोटामुळे 6 दुचाकी गाडीचेही नुकसान झाले आहे. स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मुजावर कॉलनीतील शांतीनगर येथे शरीफ मुल्ला कुटूंबासह राहतात. बुधवारी सकाळी त्यांच्या घरात अचानक स्फोट झाला. अचानक झालेल्या स्फोटामुळे मुल्ला कुटूंबियांना बचावासाठी धावण्याची संधीच मिळाली नाही. स्फोटात मुल्ला कुटूंबातील पाचजण जखमी झाले. स्फोटाचा आवाज एवढा भीषण होता की संपूर्ण मुजावर कॉलनी परिसर हादरून गेला. या हादऱ्यात मुल्ला कुटूंबाच्या घराच्या भिंतींची पडझड झाली.

परिसरातील साईनाथ डवरी, धोंडीराम शेलार, अशोक दिनकर पवार, आणि मोहसीन मुल्ला यांच्या घरांचे मोठे नुकसान झालं असून या घरातील लोक सुद्धा जखमी झाले आहेत. अग्निशमन दलासह स्थानिक नागरिकांनी धावपळ करत आग आटोक्यात आणली. जखमींना कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याचे सांगितले जात असले तरी हा भीषण स्फोट व झालेले नुकसान पाहता तर्कवितर्कांना उधाण आले असून नेमका स्फोट कसा झाला याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close