क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

सातारा, माण व पाटण तालुक्यातील घरफोडी : कराड, साताऱ्यातील चाैघांना अटक

सातारा | सातारा जिल्ह्यातील सातारा, माण व पाटण तालुक्यात घरफोडी करणाऱ्या चाैघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 49 सिलेंडर टाक्यांसह सोन्याचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने चाैघांना ताब्यात असून त्यांच्याकडून 6 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जीवन शहाजी रावते (रा. दत्तनगर, कोडोली, सातारा), अमर बापूसाहेब देवगुडे (रा. खोकडवाडी, कोडोली, सातारा), महेश अंकुश देशमुख (रा. हरपळवाडी, ता. कराड), विजय आत्माराम रिटे (रा. व्यंकटपुरापेठ, सातारा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

ICan

याबाबत अधिक माहिती अशी, अतित (ता. सातारा) येथील भारत गॅस एजन्सीच्या गोडावून मधून सिलेंडरच्या टाक्या चोरी झाल्या होत्या. याबाबत एलसीबी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर काही जणांची धरपकड केली. यामध्ये संशयितांनी अतित येथून 35 सिलेंडरच्या टाक्या व पुसेगाव येथून 14 सिलेंडरच्या टाक्या चोरी केल्याची कबुली दिली. तसेच आणखी दोन घरफोड्या केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्याकडून 1 लाख 01 हजार 500 रुपये किमतीच्या 49 सिलेंडर टाक्या व गुन्ह्यात वापरलेले 2 लाख रुपयांचे वाहन जप्त केले. एलसीबी पथकाने संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी मिळाली. संशयितांकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी सातारा, माण, पाटण या तालुक्यातही घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार संशयितांकडून चोरीस गेलेले 3 लाख 30 हजार 100 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने, तांबा पितळेची भांडी जप्त करण्यात आली.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोनि अरुण देवकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष पवार, रवींद्र भोरे, रवींद्र तेलतुंबडे, फौजदार विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके, पोलिस तानाजी माने, विजय कांबळे, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, मुनीर मुल्ला, अमोल माने, राकेश खांडके, प्रवीण कांबळे, स्वप्नील दौंड, सचिन ससाणे, मयूर देशमुख, मोहसिन मोमीन, वैभव सावंत, पंकज बेसके, प्रवीण शिंदे, प्रकाश वाघ यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close