कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

Satara News : शर्यतीत बैलगाडीची धडक बसल्याने एकाचा मृत्यू

सातारा। नागठाणे (ता. सातारा) येथे आयोजित बैलगाडी शर्यतीत एकाचा अपघाती मृत्यू झाला. बिरेंदर सिंग (मूळ रा. पंजाब राज्य, सध्या. राहणार बोरगाव, ता. सातारा) असे मृताचे नाव आहे. येथील बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी शौकिनांनी मोठी गर्दी झाली होती.

राज्यभरातून जवळपास २५० हून अधिक बैलगाड्या या शर्यतीत सहभागी झाल्या होत्या. सेमीफायनलची चाैथी फेरी सुरू असताना सीमारेषेसमोरच बेशिस्तपणे उभ्या असणाऱ्या शौकिनांपैकी बिरेंदर सिंग यांना वेगात आलेल्या बैलगाडीची जोरदार धडक बसली.

या धडकेत गंभीर जखमी बिरेंदर सिंग याला आयोजकांनी शर्यतस्थळी असलेल्या रुग्णवाहिकेतून तत्काळ नागठाण्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. या घटनेची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास हवालदार हणमंत सावंत करत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close