कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

मेढा बाजार समितीत राष्ट्रवादी- भाजपची सत्ता : महाविकास आघाडी पॅनेल पराभूत

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
मेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी- भाजप युतीच्या शेतकरी विकास पॅनल 12 जागांवर एकहाती विजय मिळवला आहे. याठिकाणी राष्ट्रवादी आणि उध्दव ठाकरे गटाला पराभवाचा सामना करावा लागला. विजयी शेतकरी पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत मोठा जल्लोष केला.

राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी आमदार मकरंद पाटील आणि भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले एकत्र येऊन वेगळं समीकरण मेढा बाजार समितीमध्ये पाहायला मिळालं. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार आणि ठाकरे गटाचे शिवसेनेचे नेते सदाशिव सपकाळ यांच्या गटाला हार पत्करावी लागली आहे.

मेढा बाजार समितीत विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
राजेंद्र सखाराम भिलारे (460), मच्छिंद्र लक्ष्मण मुळीक (533), प्रमोद बाजीराव शेलार (537), हनुमंत सहदेव शिंगटे (543), जयदीप शिवाजी शिंदे (531), प्रमोद शंकर शिंदे (535), हेमंत हिंदुराव शिंदे (530), पांडुरंग नमाजी कारंडे (865), गुलाब विठ्ठल गोळे (832), बुवासाहेब एकनाथराव पिसाळ (821)

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close