kota acadamy karad
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यशैक्षणिकसातारा

कराडला वंदे मातरम गीत गायन स्पर्धा : जनकल्याणचे सरस्वती विद्यामंदिर प्रथम 

कराड (हॅलो न्यूज)-  ज्ञानभारती कराड,जिजामाता स्मारक समिती,पुणे व शिक्षण मंडळ, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संपूर्ण वंदे मातरम गीत गायन व पाठांतर स्पर्धा शिक्षण मंडळ,कराडमध्ये उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेत कराड परिसरातील 15 शाळातील 30 समूहाने व 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सुरेल गायन,स्पष्ट उच्चार,शिस्तबद्ध सादरीकरण आणि पारंपारिक वेशभूषेत विविध संघानी संपूर्ण वंदे मातरम गीताचे सादरीकरण तथा पाठांतर केले. या स्पर्धेत जनकल्याण प्रतिष्ठान संचलित सरस्वती विद्यामंदिरने तिन्ही गटात प्रथम क्रमांक मिळवला.
या कार्यक्रमास शिक्षण मंडळाचे सचिव चंद्रशेखर देशपांडे, परीक्षक आलापिनी जोशी, गायत्री कुलकर्णी, शुभदा पटवर्धन व प्रायोजक कांचन विंगकर, योगेश कदम आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुवर्णा देशपांडे व डॉ. सुचेता हुद्देदार यांनी केले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानभारती,कराड शाखेच्या कार्यकर्त्या मंजिरी सबनीस, सुषमा काळे, डॉ. सुचेता हुद्देदार, सुवर्णा देशपांडे, सुखदा विदार,अनघा बर्डे, माधुरी साने, स्वाती भागवत, राजश्री शेंडे, आरती कुलकर्णी, डॉ. नेहा वाचासुंदर, प्रबोधिनी किरपेकर, नम्रता कंठक व पुनम वास्के यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे (लहान गट) –
प्रथम-जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यामंदिर
द्वितीय-शिक्षण मंडळ,कराड संचालित इंग्रजी माध्यमाची शाळा
तृतीय-पोदार इंटरनॅशनल स्कूल
मध्यम गट
प्रथम -जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यामंदिर
द्वितीय-शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला,कराड
तृतीय-शिक्षण मंडळ,कराड संचालित इंग्रजी माध्यमाची शाळा
मोठा गट
प्रथम-जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यामंदिर
द्वितीय-शेठ रामबिलास किसन लाल लाहोटी कन्या प्रशाला,कराड
तृतीय-टिळक हायस्कूल,कराड
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close