क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

Karad : महिलेच्या खूनप्रकरणातील संशयिताची आत्महत्या?

कराड तालुक्यात कृष्णा नदीत आढळला मृतदेह

कराड | वनवासमाची- जुने गावठाण (ता.कराड) येथील एका 65 वर्षीय वृद्धाचा कृष्णा नदी पात्राकडेला बेलवडे हवेली गावच्या हद्दीत मळी नावाच्या शिवारात मृतदेह मिळून आला. सदर घटना शुक्रवारी (दि. 17) रात्री उघडकीस आली याबाबतची फिर्याद पोलीस पाटील अक्षय तानाजी पाटील यांनी तळबीड पोलिसात दिली असून सदर मयत इसमाची चौकशी वनवासमाची गावच्या हद्दीतील डोंगरात 45 वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी सुरू होती.

Shree Furniture Karad- Patan

तळबीड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत इसमाचे नाव नामदेव तुकाराम सुतार (वय- 65) असून त्यांची मंगळवार (दि. 14) व बुधवार (दि. 15) रोजी त्यांची पोलिसांनी खुना संदर्भात चौकशी केली होती. परंतु गुरुवार (दि. 16) पासून ते घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले होते. मात्र, (दि 17) रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास बेलवडे हवेली (ता.कराड) येथील मळी नावाच्या शिवारात कृष्णा नदी पात्राकडेला त्यांचा पाण्यात बुडालेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना मिळून आला. महिलेच्या खून प्रकरणी त्यांची तळबीड पोलिसांनी चौकशी केली होती. सदरील संशयित व्यक्तीचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे तळबीड पोलिसांनी सांगितले. संबधित प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील यांचेकडे आहे.

नेमके काय आहे खूनप्रकरण
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला कराड तालुक्यातील वनवासमाची येथील डोंगराच्या वघळीत 45 वर्षीय विवाहित महिलेचा गळा आवळून डोक्यात दगड मारून निर्दयीपणे खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. लता मधुकर चव्हाण (वय- 45, रा. वनवासमाची ता. कराड) असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, घटनेची तळबीड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वनवासमाची गावच्या पश्चिमेस असणाऱ्या डोंगरातील झाडीत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. दरम्यान, शवविच्छेदनात गळा आवळून व डोक्यात गंभीर घाव घालून मारल्याचा अहवाल डॉक्टरांकडून प्राप्त झाल्याने पोलीसांनी तपासाची चक्रे गतिमान केली होती. तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. घटनास्थळी लता चव्हाण यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तसेच डोक्यावर व चेहऱ्यावरुन रक्तस्राव झाला होता.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker