शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून चोरीचा गुन्हा उघड : दोघांना अटक

सातारा प्रतिनिधी वैभव बोडके
शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाण्याची मोटर चोरीस गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या गुन्ह्यात दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पाण्याची मोटरही जप्त करण्यात आली आहे. अनिल भानुदास चव्हाण (वय- 20 वर्षे रा.हमदाबाद ता. जि. सातारा) आणि अनिल दयानंद कांबळे (वय- 24 वर्षे रा. अंजठा चौक झोपडपट्टी सातारा ता. जि. सातारा) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.15/07/2023 रोजी पाण्याची मोटार चोरीची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात देण्यात आली. सदर गुन्हाच्या घटनास्थळावर जावुन पाण्याची मोटार चोरीबाबत माहिती घेवुन संशयित इसमांचा शोध घेण्यात आला. गोपनिय बातमीदाराने चोरीस गेलेली पाण्याची मोटार ही दोन संशयीत इसमांनी चोरी केल्याचे सांगितले. त्याप्रमाणे अनिल चव्हाण आणि अनिल कांबळे या दोन संशयीतांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे सदरच्या पाण्याची मोटार बाबत विचारपुस केली. तेव्हा त्यांनी सदर पाण्याची मोटार चोरी केल्याची कबुली दिली व चोरी केलेली पाण्याची मोटार ज्या ठिकाणी चोरी करुन ठेवली होती. तेथून सदरची मोटार जप्त करणेत आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास निलेश काटकर करित आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांनी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे श्रीमती पोलीस उप-निरीक्षक अश्विनी वाघमारे, पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल पवार, स्वप्नील सावंत, सुमित मोरे, संग्राम फडतरे, सुनिल भोसले यांनी केली.