kota acadamy karad
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसातारा

सातारा व पुणे जिल्ह्यात राडा करणाऱ्या 7 जणांवर मोक्का : उंब्रज पोलिसांची कारवाई

कराड | सातारा जिल्ह्यातील उंब्रज व कराड शहर तसेच पुणे जिल्ह्यातील निगडी व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खून, खंडणी, खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत, दरोडा, जबरी चोरी, दरोड्याची तयारी, सरकारी नोकरावर हल्ला, अपहरण, आर्म ऍक्ट अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असलेल्या कराड तालुक्यातील 7 जणांना तडीपार करण्यात आले आहे.

उंब्रज पोलीस ठाणे अंतर्गत विविध दाखल गुन्ह्यातील टोळीप्रमुख मयूर महादेव साळुंखे (रा. कालगाव) व त्यांचे सहकारी पंकज अमृत यादव (रा. भवानवाडी), शाहरुख रफिक मुल्ला (रा. मसूर), सुरज सूर्यकांत जाधव (रा. वाघेश्वर), अमोल बाजीराव जाधव (रा. वाघेश्वर), अक्षय अनिल कोरे (रा. ब्रह्मपुरी- मसूर), प्रकाश आनंदराव यादव (रा. ब्रह्मपुरी- मसूर) यांच्याविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली.

या टोळी विरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती संकलित करून आरोपींच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये कारवाईकरता पोलीस अधीक्षक सातारा यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता. नमूद प्रस्तावाला कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंजुरी दिली. या गुन्ह्याचा तपास डीवायएसपी रणजीत पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. नोव्हेंबर 2022 पासून सहा मोक्का प्रस्तावांमध्ये 99 इसमांविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच 16 इसमांविरुद्ध हद्दपारसारखी कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, पोलीस नाईक अमित सपकाळ, स्थानिक गुन्हे शाखा सातारा तसेच उंब्रज पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संजय देवकुळे, श्रीधर माने यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close