ब्रिलियंट क्लासेस कराडचे ४१ विद्यार्थी होमी भाभा परीक्षेत यशस्वी


कराड :- ब्रिलियंट क्लासेस कराड चे ४१ विद्यार्थी होमी भाभा परीक्षेत यशस्वी झाले. ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा २०२५ मध्ये ब्रिलिएंट अकॅडमी कराडच्या ब्रिलियंट क्लासेस कराडचे २ विद्यार्थी कराड तालुक्यात ६८ मार्क्स मिळवून प्रथम आले आहेत. एकूण ४१ विद्यार्थी पास झाले आहेत. त्यांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष मोहन पाटील, दैनिक ऐक्यचे प्रतिनिधी प्रकाश पिसाळ, माजी कार्यकारी अभियंता एमएसइबी, शिवलिंग चिंगळे, प्रगतिशील शेतकरी,आनंदराव मोहिरे, शाळेच्या मुख्याध्यापिका रूपाली पाटील व सर्व शिक्षक यांच्यातर्फे करण्यात आला
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात होमी भाभा ही परीक्षा ई ६ वी व ९ वी या वर्गांसाठी घेतली जाते संपूर्ण महाराष्ट्रात ही परीक्षा ९ विभागात घेतली जाते, त्यामध्ये आपली शाळा कोल्हापूर विभागात येते. कोल्हापूर विभागाचा कट ऑफ हा संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात उच्च लागतो असे असेल तरीही ब्रिलियंट क्लासेस कराड चे ४१ विद्यार्थी ही परीक्षा इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण झाले आहेत.
तज्ञ मेहनती अध्यापक, योग्य पोर्शन प्लानिंग व स्वतः शाळेने तयार केलेल्या टेस्ट सीरीज चा भरपूर सराव योग्य नियोजन व मार्गदर्शन यामुळे शाळेचे विद्यार्थी सर्वोत्तम गुणवत्ता प्राप्त करत आहेत. मागील वर्षी झालेल्या परीक्षेत देखील विद्यार्थी सिल्वर मेडल व १ लाख ५ हजार स्कॉलरशिप मिळवून तालुक्यात प्रथम आले होते तसेच ८ वी स्कॉलरशिप परीक्षेत देखील ब्रिलियंट क्लासेस कराड च्या विद्यार्थ्यांनी तालुक्यात प्रथम व तृतीय दोन्ही क्रमांक मिळवले होते.
दरवर्षी मिळणारे सातत्यपूर्ण यश हे अनावधानाने मिळत नसते तर त्यामागे असते जिद्द,चिकाटी,मनाचा ठाम निर्धार, योग्य नियोजन, तज्ञ अध्यापक वर्ग, योग्य मार्गदर्शन व कायमस्वरूपी कार्यरत अध्यापक वर्ग या सर्वांचा सुवर्णयोग ब्रिलियंट च्या ब्रिलियंट क्लासेस कराड मध्ये पाहायला मिळतो येथे ई १० वी साठी ७ प्रिलिम परीक्षांचे आयोजन केले आहे त्याचा लाभ आमच्या क्लासेस चे विद्यार्थी तर घेत आहेत पण इतर विद्यार्थी पण त्यांचा मोफत लाभ घेऊ शकतात, त्यामध्ये पेपर घेऊन त्याच दिवशी आदर्श उत्तरपत्रिका प्रत्येक विद्यार्थ्याला देण्याची सोय आहे तसेच पेपर तपासून योग्य मार्गदर्शन मिळेल अशी सोय केली आहे, तसेच २८ डिसेंबर रोजी ई १० वी मध्ये शिकणारे विद्यार्थी देऊ शकतात व ९०% पर्यंत फी माफी योजनेसह शिकून स्वतः चे करियर उज्वल करू शकतात.



