kota acadamy karad
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनराज्यशैक्षणिकसातारा

लोकसहभागामुळे दक्षिण तांबवे शाळा जिल्ह्यात अग्रेसर : यशराज देसाई

पालकमंत्री यांच्या माध्यमातून शाळेला नविन इमारत : महेश पवार यांच्याकडून 11 हजारांची मदत

कराड :- जिल्हा परिषदेच्या शाळात आधुनिक तंत्रज्ञ देणे गरजेचे असून खासगी शाळाप्रमाणे सोयीसुविधा उपलब्ध होणे गरजेच आहे. स्मार्ट शाळा, स्मार्ट अंगणवाडी हा उपक्रम शासनाने राबविला असून त्यातून शाळांनी प्रगती साधली पाहिजे, त्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असून तांबवे येथे शाळेसाठी मोठा लोकसहभाग असल्यानेच विद्यार्थी घडत आहेत. सातारा जिल्ह्यात गुणवत्तेत अग्रेसर असलेल्या दक्षिण तांबवे शाळेसाठी नविन इमारत ही ज्ञानमंदिर ठरेल, असा विश्वास लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी व्यक्त केला.

दक्षिण तांबवे (ता. कराड) येथील पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून स्मार्ट शाळा अंतर्गत नव्याने बांधण्यात येणार असलेल्या चार शाळा खोल्याचे भूमिपूजन चेअरमन यशराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सरंपच निता पवार, माजी सरपंच जयश्री कबाडे, उपसरपंच अॅड. विजयसिंह पाटील, युवा नेते विक्रम पाटील, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पाटील, पंचायत समिती सदस्य दिनेश कुंभार, कोयना दूध संघाचे माजी चेअरमन लक्ष्मण देसाई, कोयना बॅंकेचे माजी संचालक अविनाश पाटील, संचालक तुकाराम डुबल, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश मोगरे, मुख्याध्यपक आबासाहेब साठे, दिनकर बाबर, तात्यासाहेब पाटील, शरद चव्हाण, वसंत बाबर, संभाजी शिंदे, आनंदा शिंदे, जगन्नाथ शिंदे, ग्रामसेवक डी. डी. गायकवाड, वसंतगडचे माजी सरपंच संदीप सावंत, शिक्षिका मनिषा साठे, सीमा देसाई, शर्मिला पाटील, वैशाली माने आदी उपस्थित होते.

प्रदीप पाटील म्हणाले, तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात तांबवे गावचे नाव दक्षिण तांबवे शाळेच्या यशामुळे अधिकारी, पदाधिकारी घेतात. शाळेचे शिक्षक आणि व्यवस्थापन समिती अत्यंत चांगल्या पध्दतीने काम करत आहे. केवळ तांबवे नव्हे तर साकुर्डी, वसंतगड, उत्तर ताबंवे, गमेवाडी, आरेवाडी यासह अन्य गावातून स्कूल बसने दक्षिण तांबवे जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी येत आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब यांनी आमच्या शाळेच्या प्रगतीसाठी केलेली मदत ही पुढे गुणवत्ता व विद्यार्थी वाढीसाठी फायदेशीर ठरेल. सूत्रसंचलन संभाजी शिंदे यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक आबासो साठे यांनी केले. तर विशाल पाटील यांनी आभार मानले.

महेश पवार यांच्याकडून 11 हजारांची मदत
जिल्हा परिषद दक्षिण तांबवे शाळेच्या गुणवत्तेत वाढ होत असून पालकांची आर्थिक मदतही मोठ्या प्रमाणात मिळत आहे. शाळेच्या बांधकामासोबत अन्य सोयी सुविधा विद्यार्थ्यांना मिळाव्यात. यासाठी अनेक पालक सढळ हाताने मदत करत आहेत. शाळा भूमिपूजनाच्या निमित्ताने खारीचा वाटा म्हणून महेश पवार यांनी शाळेला 11 हजारांची मदत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश मोगरे व शिक्षकांकडे सुपूर्द केली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close