Hello News 2026 Ganpati Arati Book
क्राइमताज्या बातम्यापर्यटनपश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

सडा वाघापूरला जाणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई : उंब्रज पोलिस ॲक्शन मोडवर

उंब्रज| उंब्रज पोलीस ठाण्यातंर्गत तारळे दुरक्षेत्र हद्दीतील सडा वाघापूर जाणाऱ्या रोडवर नाकाबंदी करुन हुल्लडबाज तरुणांवर कारवाई करण्यात आली. तारळे दुरक्षेत्र हद्दीतून सडा वाघापूर या पर्यटन ठिकाणी जाणाऱ्या रोडवर आंबा चौक तारळे व वजरोशी फाटा येथे नाकाबंदी करुन हुल्लडबाजी व दारु पिवून वाहन चालविणे तसेच सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्यात आली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील सडा वाघापूर येथील उलटा धबधबा पाहण्यासाठी जाणाऱ्या हुल्लडबाजांवर उंब्रज पोलीसांनी कारवाई केली. यामध्ये पाच दुचाकींवर दंडात्मक कारवाई करुन 2500/- रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच अवैद्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर व वाहतुकीस अडथळा करणाऱ्या एका वाहनांवर कारवाई करण्यात आली. दारु पिवून वाहन चालविणाऱ्या 14 चालकावर कारवाई करण्यात आली. तसेच दारु पिवून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ करणाऱ्या युवकांवर कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत उंब्रज पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, हवालदार निकम, जगताप, पो. कॉ. पाटील, अवघडे, लोहार, कोळी तसेच होमगार्ड यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close