क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसांगलीसातारा

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात शस्त्रे विकणारा तस्कर पोलिसांच्या जाळ्यात : सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा | सातारा ते पुणे जाणाऱ्या हायवे रोडचे सर्व्हिस रोडवर विरमाडे गावचे हद्दीतील हॉटेल महाराजचे समोर सापळा लावून तीन इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एका इसमाच्या ताब्यातून 3 लाख 27 हजार 000 रुपये किंमतीची 5 देशी बनावटीची पिस्टल व 10 जिवंत काडतूस असा मुद्देमाल मिळून जप्त करण्यात आला. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली माहे नोव्हेंबर 2022 पासून सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 32 देशी बनावटीची पिस्टल व 40 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली होती. परंतू सदरची पिस्टल व काडतुसे कोठून महाराष्ट्र राज्यामध्ये आणली जात होती याबाबत तपासामध्ये माहिती प्राप्त होत नव्हती. त्याअनुशंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली एक विशेष पथक तयार करुन त्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये देशी बनावटीची शस्त्रे पुरविणाऱ्या लोकांची माहिती प्राप्त करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

सदरील पिस्टल महाराष्ट्र राज्यामध्ये बेकायदेशीर विक्री करण्याकरिता मध्यप्रदेश येथून पुरविली जात असल्याबाबत पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना गोपनिय माहिती प्राप्त झाली होती. तसेच मध्यप्रदेश येथील बेकायदा देशी बनावटीच्या पिस्टल महाराष्ट्रात विक्री करणारा महेंद्र प्रकाश पावरा (रा.उमर्टी ता. चोपड़ा जि.जळगाव) हा सातारा ते पुणे दरम्यान विरमाडे गावचे हद्दीत पिस्टलची विक्री करण्याकरीता आला आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे विशेष पथकास कारवाईच्या सूचना दिल्या. विशेष पथकाने प्राप्त माहितीचे ठिकाण विरमाडे (ता. वाई, जि. सातारा) गावचे हद्दीतील सातारा ते पुणे जाणारे हायवे रोडचे सर्व्हिस रोडवर हॉटेल महाराजचे समोर सापळा लावून महेंद्र प्रकाश पावरा (वय- 22, रा.उमर्टी ता.चोपडा जि. जळगाव), वैभव बाळासो वाघमोडे (वय- 21, रा.बलगवडे ता. तासगाव जि. सांगली) व अशोक विठ्ठल कार्वे (वय- 58, रा.येरवळे ता.कराड जि. सातारा) या तीन इसमांना ताब्यात घेण्यात आले.  त्यापैकी एका इसमाच्या ताब्यातून 3,27,000/- रुपये किंमतीची 5 देशी बनावटीची पिस्टल व 10 जिवंत काडतूस असा मुद्देमाल मिळून जप्त करण्यात आला. माहे नोव्हेंबर 2022 पासून एकूण 37 देशी बनावटीची अग्निशस्त्रे व 50 काडतुसे जप्त करण्यात आलेली आहेत.

पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, तानाजी माने, अतिश घाडगे, विजय कांबळे, संजय शिर्के, मोहन नाचण, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, अमोल माने, मुनीर मुल्ला, गणेश कचरे, अजित कर्णे, अर्जुन शिरतोडे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, स्वप्नील माने, शिवाजी भिसे, स्वप्नील दौंड, सचिन ससाणे, केतन शिंदे, मयुर देशमुख, धीरज महाडीक, मोहसिन मोमीन, वैभव सावंत, सायबर विभागाचे अजय जाधव, अमित झेंडे यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाई मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker