kota acadamy karad
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यशैक्षणिकसातारा

कोटा अकॅडमीच्या सिद्धी रामुगडेचे जेईई ऍडव्हान्स परीक्षेत उल्लेखनीय यश; मोबाईल देऊन विशेष सत्कार

कराड – देशातील सर्वाधिक प्रतिष्ठेची आणि अत्यंत कठीण मानली जाणारी जेईई ऍडव्हान्स ही आयआयटी प्रवेश परीक्षा
नुकतीच पार पडली असून तिचा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धात्मक परीक्षेत कोटा अकॅडमीची विद्यार्थिनी सिद्धी रामुगडे हिने राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. जाहीर झालेल्या निकालानुसार सिद्धीने देशात ६८५४ वा अखिल भारतीय क्रमांक (AIR) मिळवला असून तिने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमधून अव्वल क्रमांकांमध्ये स्थान मिळवणे ही अत्यंत अभिमानाची बाब असून तिच्या या यशामुळे देशातील नामांकित आयआयटी संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्याचे तिचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सिद्धीच्या या उल्लेखनीय यशामुळे कोटा अकॅडमीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून संस्थेचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे. तिच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याप्रसंगी कोटा अकॅडमीचे संचालक डॉ. महेश खुस्पे, संचालिका सौ. मंजिरी खुस्पे आणि मैथिली खुस्पे , प्राचार्य जयश्री पवार यांनी सिद्धीचे विशेष कौतुक करून तिचे अभिनंदन केले. तसेच तिच्या या घवघवीत यशाचा गौरव म्हणून अकॅडमीच्या वतीने तिला स्मार्टफोन (मोबाईल) भेट देऊन तिचा विशेष सत्कार करण्यात आला आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी सिद्धी चे आई व वडील उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. महेश खुस्पे म्हणाले, विद्यार्थ्यांची कठोर मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि अकॅडमीचे प्रभावी शैक्षणिक नियोजन यांमुळेच आज संस्थेचे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर यशाची नवी शिखरे गाठत आहेत. या प्रसंगी अकॅडमीच्या प्राचार्या जयश्री पवार यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सिद्धीच्या या यशामुळे अकॅडमीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्या भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी सर्वांकडून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. यापूर्वी हि सिद्धी ने भारत सरकार च्या संरक्षण मंत्रालयाच्या च्या वीरगाथा या स्पर्ध्येत मेडल व 10000 रुपये बक्षीस मिळवून 26 जानेवारी च्या परेड मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती व संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते तिला गौरवण्यात आले होते .

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close