Hello News 2026 Ganpati Arati Book
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

कराड तालुक्यात दोन जणांच्या आत्महत्या

कराड | कराड तालुक्यातील आगाशिवनगर व विजयनगर येथे दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी वेगवेगळ्या ठिकाणी या दोन घटना घडल्या असून यांची नोंद कराड शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.

मंजुनाथ संगप्पा पाटील (वय- 35, मुळ रा.बागलकोट, कर्नाटक सध्या रा. शिवकाशी अपार्टमेंट, कराड) यांने इंद्रप्रस्थ कॉलनी, आगाशिवनगर येथे जंगली झाडाला कापडी स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली.

विजयनगर (ता. कराड) येथे राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने नारायण ईश्वर वाघमारे (वय 65, रा. विजयनगर) यांनी आत्महत्या केली. आत्महत्यांचे कारण रात्री उशिरापर्यंत समोर आले नव्हते. या दोन्ही घटनेची नोंद कराड शहर पोलिसात झाली असून अधिक तपास पोलिस करत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close