kota acadamy karad
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

खासदार श्रीनिवास पाटील साहेब डोंगरी भागाची जाण असलेलं नेतृत्व : सारंग पाटील

कराड | खा. श्रीनिवास पाटील साहेब हे याच मातीतील असून डोंगरी भागातील जाण असलेल्या त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा लोकसभा मतदारसंघातील विविध कामे वेगाने करता आली, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी केले.

हनुमंतवाडी (ता.कराड) येथे हनुमंतवाडी (सवादे), येवती, घराळवाडी, चव्‍हाणवाडी, मस्‍करवाडी, धाामणी, डाकेवाडी, निवी (इजिमा 130) रस्त्याची सुधारणा करणे कामाच्‍या भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उदयआबा पाटील, सरपंच सौ.कोमल मोरे, लक्ष्मण मोरे, चंद्रकांत मोरे, डी. के. मोरे, आबासो शेवाळे, अंकुश मोरे, बाबासो इंगळे, आत्माराम निकम  पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सारंग पाटील म्हणाले, सातारा लोकसभा मतदार संघातील पश्चिम भाग हा डोंगरी असून प्रत्‍येक वाडीवस्‍तीवर खा. श्रीनिवास पाटील यांच्‍या माध्‍यमातून विकासकामे झाली आहेत. दुर्गम असणारी गावे विकासकामाद्वारे जोडली गेल्‍यामुळे लोकांच्‍यातून समाधान व्यक्‍त होत आहे. कराड दक्षिणमधील उंंडाळे महसूल मंडल खूप मोठे आहे. या मंडलात रस्‍ते, वीज, पाणीपुरवठा योजना, सभामंडप, सामाजिक भवन, मोबाईल टॉवर, क्रिडा व आरोग्‍य सेवेशी निगडीत अनेक कामे खा.श्रीनिवास पाटील यांच्‍या माध्‍यमातून झालीत याचा आनंद आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close