क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

Satara News : फ्रिजमधील कॉम्प्रेसर चोरीचा छडा, एक जण जेरबंद

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
फ्रिजमधील कॉम्प्रेसर चोरणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण पथकाने तीन दिवसात चोरीचा छडा लावला. संशयीत महादेव शंकर वायदंडे (वय- 35 वर्षे, रा. कोडोली, ता. कराड) यास अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या एका फ्रीज दुरुस्ती करणाऱ्या गोडाऊन येथून मोठ्या प्रमाणात कॉम्प्रेसर चोरी झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. गेल्या तीन दिवसापासून पोलिस या गुन्ह्याचा छडा लावण्याचे काम सुरू होती. पोलिसांना गोपनीय खबऱ्यांकडून चोरीच्या गुन्ह्यातील एका संशयीताची माहिती मिळाल्यानंतर त्यास ताब्यात घेतले. संशयिताकडे सखोल चौकशी करून चोरीच्या गुन्ह्यातील चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश मिळाले.

शाहूपुरीचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, पोलीस नाईक महेश बनकर, अभय साबळे, पोलीस अंमलदार सचिन पवार, स्वप्नील सावंत, स्वप्नील पवार, सुमित मोरे, सुनिल भोसले यांनी कारवाईत सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस नाईक पुनम करपे करत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close