पुणे बेंगलोर महामार्गावर मध्यरात्री थरार : इंदोली फाटा येथे अंदाधुंद गोळीबारात एक जण गंभीर जखमी

उंब्रज प्रतिनिधी – श्रीकांत जाधव
पुणे बेंगलोर महामार्गावर मध्यरात्री थरार
अंदाधुंद गोळीबारात एक जण गंभीर जखमी
मित्रांतील पैशाचा की भाईगिरीतील गॅंगवॉर?
चार ते पाच गोळ्या झाडल्याची माहिती
जखमीच्या दोन्ही पायात गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती
कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये गंभीर जखमी वर आयसीयूत उपचार सुरू
आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना
पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यातील उंब्रजजवळ असलेल्या इंदोली फाटा येथे मध्यरात्री अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. मित्रांमधील पैशातील व्यवहाराच्या वादातून की भाईगिरीच्या गॅंगवॉरमधून ही घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर कराड येथील कृष्णा रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची आहेत . संबंधितांनी चार ते पाच गोळ्या झाडल्याचे सांगितले जात असून त्यापैकी दोन गोळ्या जखमीच्या दोन्ही पायात लागलेल्या असून मसूर भागातील जखमी आहे .



