दक्षिण तांबवेच्या जिल्हा परिषद शाळेला खेळाचे साहित्य भेट

कराड | कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सरचिटणी डॉ. अतुल भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा दक्षिण तांबवे या ठिकाणी स्पोर्टस् साहित्यांचे वाटप करण्यात आले. खेड्यातील या शाळेला खेळाचे साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी आनंद व्यक्त केला.
दक्षिण तांबवे (ता. कराड) येथील जिल्हा परिषद शाळेत परिसरातील अनेक वाडी- वस्त्यांमधून मुले शिक्षणांसाठी येत आहेत. या शाळेतील विद्यार्थी नवोदय, मंथन, स्काॅलरशिप परिक्षेत नेहमी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत आहेत. शिक्षमासोबत आता खेळातही ग्रामीण भागातील विद्यार्थी चमकला गेला पाहिजे, यासाठी प्रगतशील शेतकरी सुरेश फिरंगे- पाटील यांच्या पुढाकारातून स्पोर्टस साहित्य शाळेला भेट देण्यात आले.
शाळेला फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, दोर उड्या अशा अनेक विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सुरेश फिरंगे- पाटील, शरद साठे, तानाजी पवार, राजेंद्र शिंदे (फौजी), जिल्हा परिषदेचे उपशिक्षक आबासाहेब साठे, डॉ. सतीश सोनवणे उपस्थित होते.