kota acadamy karad
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

कराडच्या डीबीने स्वीफ्ट आणि इनोव्हा क्रिस्टा केली जप्त : Fraud टोळी सापडली

कराड | चारचाकी गाडी चोरून बनावट आर. सी. बुकच्या सहाय्याने गाड्या विक्री करून गंडा घालणा-या टोळीचा कराड शहर पोलीसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला. या प्रकरणात कोल्हापूर, बेलवडे हवेली व कराड येथून तिघांना ताब्यात आले असून संशयितांना 5 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्यात आरोपींकडून एक स्वीफ्ट आणि टोयोटा कंपनीची इनोव्हा क्रिस्टा गाडी जप्त केली आहे. हर्षद पवार (रा. कोल्हापूर, जि. कोल्हापूर, तेजस सपकाळ (रा. कराड), युवराज कांबळे ऊर्फ पाटील ऊर्फ हजारे (रा. बेलवडे हवेली, ता. कराड) अशी संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहर पोलीस ठाण्यात स्वीट गाडीची चोरी करुन तीचे बनावट आर. सी. बुक बनवुन गाडीची विक्री केल्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता. नमुद गुन्ह्यातील आरोपी हे कोल्हापुर व कराड मधील असल्याची गोपनीय माहिती पोलीस उप निरीक्षक आर. एल. डांगे यांना गोपनिय बातमीदार मार्फत प्राप्त झाली होती. आरोपीचा शोधासाठी एक पथक कोल्हापुर व दुसरे पथक कराड तालुका पोलीस ठाणेच्या हद्दीत रवाना झाले. तांत्रिक माहितीच्या आधारे रात्री उशिरा आरोपीना कोल्हापुर, बेलवडे हवेली (ता. कराड) मधुन ताब्यात घेतले. संशयित आरोपीकडून एक मारुती सुझुकीची स्वीफ्ट आणि टोयोटा कंपनीची इनोव्हा क्रिस्टा अशा एकूण 20,00,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरील गाडीची चोरी करुन तीचे बनावट आर.सी. बुक बनवुन गाडीची विक्री केलेबाबत इतर पोलीस ठाण्यातही गुन्हे नोंद दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बागर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर व कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विभुते, पोलीस उपनिरिक्षक आर. एल. डांगे, सफौ. देसाई, पोलीस नाईक संतोष पाडळे, पो. शि. महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, संतोष लोहार, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close