kota acadamy karad
ताज्या बातम्याधार्मिकपश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

उरुल येथील श्रीबलभिम महाराज व कुंतीमाता यात्रा उत्साहात (Video)

मल्हारपेठ प्रतिनिधी | निवास सुतार
उरूल (ता. पाटण) येथे श्रीकृष्ण जन्माष्ठमी पासून श्रीबलभिम महाराज व कुंतीमाता यात्रा उत्सवास प्रारंभ सुरु होतो. बुधवारी (दि. 4) पार पडलेल्या श्रीबलभिम महाराज व कुंतीमाता उत्सवाला भाविकांनी अलोट गर्दी केली होती. यानिमित्ताने यात्रा कमेटीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उरूल येथे दरवर्षी श्रीबलभिम महाराज व कुंतीमाता उत्सव साजरा करण्यात येतो़.

भाद्रपद महिन्यात पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो. श्रीकृष्ण जन्माष्ठमी पासुन या उत्सवास सुरुवात होते. सर्व बारा बलुतेदार समाज एकत्रीत येऊन श्रीबलभिम महाराज व कुंती माता मुर्तीसाठी आवश्यक असणारी माती परीसरातील असणाऱ्या वारुळाचे विधीवत पुजन करुन मातीचे गोळे करुन श्रीकृष्णजन्माष्टमी दिवशी आणली जाते. गणेशोत्सवा बरोबर या उत्सवाची भाविकांकडून उपासना केली जाते़. गणेश विसर्जनानंतर भाद्रपद षष्ठीला श्रीबलभिम महाराज व कुंतीमाता मूर्तींचे पारंपारीक वाद्यांची साथीने भाविक भक्तांच्या जयघोषात मिरवणूक झाल्यानंतर विसर्जन केले जाते़.

या दिवशी गावात यात्रा भरवली जाते़. दरवर्षी पंचमीला भर असते तर षष्ठीला खेळणे असते. भरीच्या दिवशी सायंकाळी देवदर्शन सोहळा असतो. तदनंतर रात्री भजन, जागर, गोंधळ, पहाटे गणगवळण असते. तर षष्ठीच्या दिवशी सामुदायिक महाआरती करुन मुर्ती ट्रॅक्टरमध्ये घेतात व मिरवणुकीला पारंपारिक वाद्याच्या सुरुवात होते. नंतर विसर्जन केले जाते. लोकांच्या मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीही हा उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. विसर्जनानंतर भरवण्यात येणाऱ्या यात्रेत प्रतिवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.यात्रेमध्ये अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close