क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

पुणे- बेंगलोर महामार्गावर कार- दुचाकी धडकेत कोर्टीतील युवक ठार

कराड | पुणे- बेंगलोर आशियाई महामार्गावर इंदोली (ता. कराड) गावच्या हद्दीत टीव्हीएस इलेक्ट्रिक मोटरसायकलला पाठीमागून भरधाव येणाऱ्या कारने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटर सायकलस्वार गंभीर जखमी होऊन ठार झाला. सुनील बाजीराव यादव (वय- 34, रा. कोर्टी, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. अपघात प्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी (दि.1) रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास कराड ते सातारा जाणाऱ्या लेनवर इंदोली फाटा येथे माई मंगल कार्यालयासमोर ही घडली. सागर सुधाकर यादव (वय- 29) यांनी अपघात प्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रात्रीच्या सुमारास सुनिल यादव हे त्यांच्या इलेक्ट्रिक मोटरसायकलवरुन पेरले फाटा येथे काम आवरुन घरी निघाले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या मारुती सुझुकी इगणीस क्रमांक (एमएच- 11 डीए- 8419) ने पाठीमागून येवून जोराची धडक दिली.

या धडकेत सुनील यादव गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्याना उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापुर्वी सुनिल यादव हे मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात कार चालक रविंद्र ज्ञानदेव पोतेकर (रा. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker