kota acadamy karad
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यशैक्षणिकसातारा

SSC Exam : तांबवेच्या स्वा. सै. आण्णा बाळा पाटील विद्यालयाचा 100 टक्के निकाल

हेमलता साठे व सृष्टी शिंदेचा प्रथम क्रमांक

कराड | यशवंत एज्युकेशन सोसायटी तांबवेचे स्वातंत्र्यसैनिक आण्णा बाळा पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला. कुमारी हेमलता दत्तप्रसाद साठे (95%) आणि कुमारी सृष्टी शरद शिंदे (95%) या दोघांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्याच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव व मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले.

तांबवे येथील स्वा. सै. आण्णा बाळा पाटील विद्यालयात द्वितीय क्रमांक- जागृती जयवंत पवार (94.60%), तृतीय क्रमांक- केतन विनायक पाटील (94%), चतुर्थ क्रमांक- कीर्ती पंडित पाटील (92.20%), पाचवा क्रमांक- सिद्धी ज्योतीराम पवार (92%), सहावा क्रमांक- श्रेयस दत्तात्रय गरुड (90.80%), सातवा क्रमांक- आदेश सुनील चव्हाण (90.60%), आठवा क्रमांक- वेदांतिका विश्वासराव पाटील (90%) या विद्यार्थ्यांनी 90 टक्केपेक्षा अधिक मार्क मिळवले.

विद्यालयातून एकूण 88 विद्यार्थी परिक्षेसाठी बसले होते, ते सर्व उतीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन निवासराव पाटील, मुख्याध्यापक एस. व्ही. पोळ, माजी मुख्याध्यापक एम. जे. पाटील यांच्यासह सर्व विश्वस्त, यशवंत एज्युकेशन सोसायटी तांबवे, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close