उंडाळकर- भोसले गट जिल्हा बॅंक, बाजार समितीत कायम सोबत : डाॅ. सुरेश भोसले
विरोधकांनी कारखान्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा केला


कराड :- उंडाळकर – भोसले गट एकत्र आहे, हे आमचे भाग्य आहे. एक निवडणूक सोडली तर उंडाळकर- भोसले एकत्र आहेत. विलासराव पाटील (काका) आणि जयवंतराव भोसले (आप्पा) कायम शेवटपर्यंत सोबत राहिले. विचाराने आम्ही एकत्र होतो, त्यामुळे आम्ही कायम एकत्रच आहोत. बाजार समिती, जिल्हा बँकेत आमचे सहकार्य कायम राहील. ही तडजोड नाही तर भागाच्या विकास होत राहणे महत्वाचे आहे. भोसले – मोहिते 2010 साली एकत्र आले, तेव्हा विरोधक केवळ विलासराव पाटील (काका) यांच्यामुळे सत्तेत काही लोक आले. मात्र, सहकारी संस्थात होवू नये, असे बदल झाले. महाराष्ट्राच्या कारखानादारीतील सर्वात मोठा 60 कोटींचा घोटाळा झाला, असल्याचा आरोप कारखान्याचे सहकार पॅनेलचे प्रमुख डाॅ. सुरेश भोसले यांनी विरोधकांवर केला.
कार्वे (ता. कराड) येथे आयोजित रयत संघटना व कृष्णा कारखाना सभासदांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी रयत संघटनेचे नेते अँड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, वडगांवचे डाॅ. सुधीर जगताप, प्रा. धनाजी काटकर, पंचायत समितीचे सदस्य नितीन थोरात, कोयना दूध संघाचे व्हाईस चेअरमन शिवाजीराव जाधव, माजी सभापती प्रदीप थोरात, राजू मुल्ला, बापूसाहेब सांळुखे यांच्यासह शेतकरी सभासद उपस्थित होते.
डाॅ. सुरेश भोसले म्हणाले, उंडाळकर – भोसले गट एकत्र आहे, हे आमचे भाग्य आहे. यशवंतराव चव्हाण साहेब म्हणायचे स्वातंत्र्याची लढाई अवघड होती, तशीच लोकांची आर्थिक, सामाजिक उभारणी ही लढाई सुध्दा साधी नव्हती. सहकाराचा विचार अंगी जडल्याने आम्ही इथे एकत्र आलो. आमच्यातील संघर्ष थांबला आणि संस्थाचा विकास झाला. एक निवडणूक सोडली तर उंडाळकर- भोसले एकत्र आहेत. विलासराव पाटील (काका) आणि जयवंतराव भोसले (आप्पा) कायम शेवटपर्यंत सोबत राहिले. विचाराने आम्ही एकत्र होतो, त्यामुळे आम्ही कायम एकत्रच आहोत. बाजार समिती, जिल्हा बँकेत आमचे सहकार्य कायम राहील. ही तडजोड नाही तर भागाच्या विकास होत राहणे महत्वाचे आहे. भोसले – मोहिते 2010 साली एकत्र आले, तेव्हा विरोधक केवळ विलासराव पाटील (काका) यांच्यामुळे सत्तेत काही लोक आले. मात्र, सहकारी संस्थात होवू नये, असे बदल झाले. महाराष्ट्राच्या कारखानादारीतील सर्वात मोठा 60 कोटींचा घोटाळा झाला. एक दोन नव्हे तर 778 लोकांच्या नावावर खोट्या सह्या घेऊन घोटाळा झाला अन् कोणाच्यातरी सल्ल्याने हा कारखाना चालवला जात होते. कृष्णा कारखान्याच्या चेअरमनला जेलमध्ये जावे लागते, यामुळे कृष्णा कारखान्याची बदनामी झाली काळ डाग लागला. अविनाश मोहिते यांच्या काळात 1400 कामगाराचं रेकॉर्ड नसललेल्या कामगारांना महिन्याला 50 लाख रूपये दिले जात होते. त्यामुळे सहकार पॅनेलची सत्ता आली. तेव्हा कारखाना चालवायला पैसे नव्हते. शेवटी उधारीवर कारखाना चालवला. उंडाळकर – भोसले पॅटर्न लोकांनी मान्य केला आहे. सहकार संघर्षातून नव्हे सहकार्याने पुढे संस्था चालल्या आहेत.
अँड. उदयसिंह पाटील – उंडाळकर म्हणाले, रयत संघटना आणि कृष्णा उद्योग समुहाने सहकारात 35 वर्ष काम केले. या बदलत्या समीकरणात आपण एकत्र आले पाहिजे, हे कार्यकर्त्यांनी मांडले. कोट्यावधीची इंडस्ट्री उभी करायची असेल तर सहकारात एकत्र पाहिजे. आम्ही महायुती म्हणून एकाच ठिकाणी आहोत. शेतकरी सभासद टिकला पाहिजे, यासाठी सहकारातील कारखान्यानी बँकाची कर्ज घेऊन चालवले आहेत. प्रत्येक वेळी विरोधला विरोध करून चालत नाही. सहकार सक्षम केल्याशिवाय काम करण सोप नाही. आपल्या विचारांची लोक आहेत, त्यांनी सहकार पॅनेलला मतदान करायला लावा. आपण सहकार सोबत आहोत, विजय निश्चित आहे केवळ मताधिक्य वाढण्यसाठी प्रत्येक मतदार मतदान केंद्रावर नेण्याची जबाबदारी पार पाडावी.



