कराड पंचायत समिती : शिक्षण विभागाकडून 57 दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य

कराड । विशाल वामनराव पाटील
सातारा जिल्हा परिषद, सातारा व पंचायत समिती शिक्षण विभाग, कराड यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य साधने वितरण करण्यात आले. कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण हॉल (बचत भवन) येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मीना साळुंखे,कराड पंचयात समितीचे गटशिक्षणाधिकारी सन्मति देशमाने, विजय परीट, जमिला मुलाणी व रमेश कांबळे यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमात नवोदय परीक्षेत कराड तालुक्यातून यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्याच्या मार्गदर्शक शिक्षकांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सदर कार्यक्रमात कराड विकास गटातील 57 दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या 88 साहित्य साधनांचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करणेत आले. (श्रवणयंत्र- 52, व्हील चेअर- 21, माॅडीफाय चेअर- 08, ब्रेल किट- 02, पांढरी काठी- 02, लो-व्हिजन किट- 02, किमोड चेअर- 01) दिव्यांग विद्यार्थ्यांची शाळेतील व गावातील अध्ययन प्रक्रिया सुलभ व्हावी. शाळेतील विद्यार्थ्यांचे उपस्थितीचे प्रमाण वाढावे, हा साहित्य वितरणाचा उद्देश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशव चौगुले यांनी केले. सूत्रसंचालन शकुंतला देवकांत यांनी केले.