पवनचक्की तारेची चोरी उघड : कराड, पाटणच्या चाैघांना अटक

पाटण (हॅलो न्यूज) – पाटण पोलीसांना ढेबेवाडी पोलीस ठाणे हददीतील पवनचक्कीतील तांब्याच्या तारेची चोरी उघड करण्यात यश आले आहे. या कारवाईत 1 लाख 40 हजार रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला असून कराड व पाटण तालुक्यातील 4 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील डोंगर पठारावर मोठ्या प्रमाणावर पवनचक्क्या असुन सदर पवनचक्कीतील तांब्याची तार असलेल्या केबल चोरीचे प्रमाण हे गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढलेले होते. सदर चोरीच्या तक्रारी या पाटण पोलीस ठाणेस दाखल झाल्याने पोलीस ठाणेस गुन्हे नोंद करण्यात आलेले होते. सदरच्या गुन्हे उघड करुन त्यातील चोरी करणारे आरोपी व चोरीस गेलेला मुददेमाल जप्त करण्यात आलेला होता. सदरचे आरोपी यांचेकडे पाटण पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्यपुर्ण तपास करुन देबेवाडी पोलीस ठाणेस दाखल असलेला पवनचक्की केबल चोरीचा गुन्हा उडकीस आणलेला आहे.
सदरच्या गुन्ह्यात 1) रुपेश दिलीप पाटील (रा.पोतले, ता. कराड जि. सातारा), 2) राहुल दादासो कदम (रा. वडगाव ता. कराड), 3) अनिल यशवंत सुतार (रा. सुतारवाडी, सणबुर ता. पाटण), 4) संतोष शामराव सरगर (रा. पाण्याच्या टाकीजवळ, चिखली, ता. कराड) यांना अटक करण्यात आले आहे. त्यांचेकडुन उघवने (ता. पाटण) येथील पवनचक्कीतील चोरी केलेली 1,40,000/- रुपये किमतीची तांब्याची केबल जप्त करण्यात आलेली आहे. वर नमुद आरोपींकडुन ढेबेवाडी पोलीस ठाणेस दाखल असलेला खालील नमुद गन्हा उघड करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, पाटण विभाग पाटण सुदाम पाचोरकर यांचे मार्गदर्शनाखाली पाटण पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक निलेश तारु, पोलीस उपनिरीक्षक विपीन चव्हाण, संजय राउत, आनंदा आव्हाड, पोलीस हवालदार वैभव पुजारी, उमेश मोरे, अमृत आळंदे, दादासो लोंढे, आबासाहेब गलांडे, संतोष माने, संतोष कुचेकर, शब्द गुरव, राजेंद्र मोहिते, हणमंत नलवडे, केतन नाकाडे, आशिष कांबळे यांनी केलेली आहे.



