निवडणूक निकाल : कोडोली विकास सेवा सोसायटीत 15 वर्षांनी सत्तांतर
सत्ताधाऱ्यांना 13- 0 दणका

कराड | कोडोली ग्राम विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणूकीत 15 वर्षांनी सत्तांतर करण्यात यश आले. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना दणका बसला असून गुरू गोदडगिरी महाराज शेतकरी विकास पॅनेलने (ट्रॅक्टर चिन्ह) 13- 0 असा एकहाती विजय मिळवला आहे. सोसायटीसाठी एकूण 757 मतदान झाले होते. त्यापैकी 733 मते वैध तर 24 मते बाद ठरली.
कोडोली येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अॅड. उदयसिंह पाटील व अतुल भोसले, कृष्णा कारखान्यांचे माजी चेअरमन अविनाश मोहिते समर्थकांनी एकत्रित विजय मिळवला आहे. या निवडणूकीत श्री गुरुवर्य गोदडगिरी महाराज ग्रामविकास पॅनेलचा दारुण पराभव झाला. कराड तालुक्यातील वारुंजी सोसायटी काँग्रेस 12/1 विजयी, जिंती सोसायटी काँग्रेस 12/1 विजयी, शेनोली सोयासायटी काँग्रेस 9/4 विजयी. तर तुळसण येथे 13-0 असा भाजपाचे डाॅ. अतुल भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पॅनेलने विजय मिळवला.
विजयी उमेदवार व त्यांची मते कंसात- सर्वसाधारण मतदारसंघातून- अभिजीत श्रीरंग जगताप (429), निवास जगन्नाथ जगताप (388), महेंद्र जयवंत जगताप (393), शिवाजी तानाजी जगताप (386), हणमंत सिदु जगताप (371), कृष्णा रघुनाथ मोरे (355), नारायण हिंदुराव मोरे (368), काशिनाथ गोविंद साळुंखे (409), महिला राखीव मतदार संघातून- राजश्री भरत जगताप (429), शैलजा ज्योतीराम पाटील (371). अनुसूचित जाती/ जमाती मतदार संघातून- युवराज बापू गोतपागार (413), इतर मागास प्रवर्ग राखीव मतदार संघातून- मधुकर बाबुराव माने (429), विमुक्त जाती प्रवर्गातून- दत्तात्रय बाबू मदने (451).