Hello News 2026 Ganpati Arati Book
पश्चिम महाराष्ट्रसातारा

पेन्शन संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष अमानुल्ला फकीर (गुरूजी) याचे निधन

कराड | दैनिक लक्ष्मीपुत्रचे संपादक सुलतान फकीर यांचे वडील व कराड तालुका पेन्शन संघटनेचे माजी अध्यक्ष व प्रगतशील शेतकरी अमानुल्ला गणी फकीर (गुरुजी) यांचे 28 मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

कराड तालुका पेन्शन संघटनेचे अध्यक्ष असताना त्यांनी अनेक विधवा महिलांना लवकरात लवकर पेन्शन मिळण्यासाठी प्रयत्न करत होते. तसेच पेन्शन धारकांच्या विविध प्रश्न मार्गी लागण्यासाठी व वेळेवर पेन्शन बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी वेळोवेळी संघटनेच्या माध्यमातून तालुका व जिल्हा स्तरावर अधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊन प्रश्न मार्गी लावण्यामध्ये अग्रेसर असत.

रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम आज 30 रोजी सायं 5.30 वाजता त्यांच्या घरी वैकुंठ धाम स्मशानभूमी (कब्रस्तान) कोळे (ता. कराड) येथे करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close