क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

कराड तालुक्यातील प्रकार : मोबाईलवर स्टेटस ठेवल्याने मध्यरात्री युवकाला राहत्या घरातून उचलले अन्

मसूर प्रतिनिधी। गजानन गिरी
मोबाईलवर स्टेटस का ठेवले या कारणावरून एकास मसूरमधील दोघांनी लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. मारहाण झाल्याची तक्रार प्रथमेश दादासो वाघमारे (वय- 28, रा. कोणेगाव, ता कराड) यांनी उंब्रज पोलीसात दिली आहे. दीपक गणेश कांबळे (वय- 22) व विशाल मोहन रामुगडे (वय- 22) यांच्याविरुद्ध मारहाणीची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे. मारहाणीचा प्रकार शनिवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोबाईलवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून प्रथमेश वाघमारे याला दीपक कांबळे व विशाल रामूगडे या दोघांनी राहत्या घरातून उचलून काऺबिरवाडी गावचे हद्दीत नेऊन लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. मारहाण करणाऱ्या दोघांच्या विरोधात उंब्रज पोलिसात तक्रार दाखल झाली आहे.

युवकाला मारहाण करणाऱ्या दोन युवकांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली. अशी माहिती उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरडे यांनी दिली. गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील तपास करीत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker