सातारा जिल्ह्यात 7 दिवस ‘या’ मार्गावर वाहतुकीत बदल : अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

सातारा । श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी (Shri Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Ceremony) सोहळा दि. 18 जून ते दि 23 जून 2023 या कालावधीत सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार असून हा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातुन सातारा जिल्ह्यात दि.18 जून 2023 रोजी पाडेगाव, लोणंद येथे प्रवेश करणार असून त्यानंतर लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या ठिकाणी मुक्काम करुन दि. 23 जून 2023 रोजी सोलापूर जिल्ह्यात जाणार आहे. या सोहळयानिमित्त जिल्ह्यात वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी केले आहे.
पालखी सोहळा हा निरा- लोणंद- फलटणमार्गे पंढरपूर रस्त्याने जाणार असल्याने तसेच पालखी सेाहळयात लाखो भाविक सहभागी होणार असल्याने पालखी जाणारे मार्गावर कोणताही अपघात घडू नये, वाहतूक समस्या निर्माण होवू नये तसेच अनुचीत प्रकार घडू नये याकरिता पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 34 प्रमाणे प्राप्त अधिकारान्वये पालखी सोहळ्यातील वाहनाखेरीज व अत्यावश्यक सेवेतील (पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहने) खेरीज करुन इतर सर्व वाहनांना निरा- लोणंद- पंढरपूर मार्गावर (Nira-Lonand-Pandharpur Road) दि.18 जून ते दि.23 जून 2023 या कालावधीत खाली नमुद केल्याप्रमाणे प्रवेश करण्यास मनाई करीत आहे.
वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे – 1) दि. 17 जून 2023 रोजीचे सकाळी 6.00 वा. पासून ते दि.21 जून 2023 रोजीचे 24.00 वा. पर्यंत फलटण येथून निरा लोणंदकडे येणारी वाहतूक बारामती किंवा वाठार स्टेशन येथून पूण्याकडे शिरगांव घाटातून वळविण्यात येत आहे.
2) दि. 17 जून 2023 रोजीचे रोजीचे सकाळी 6.00 वा. पासून ते दि.20 जून 2023 रोजीचे 24.00 वा पर्यंत आदर्की फाटा येथून लोणंदकडे येणारी वाहतूक पालखी सोहळयातील येणाऱ्या वाहनाखेरीज इतर वाहनांना बंदी करण्यात येत आहे.
3) दि. 17 जून 2023 रोजीचे सकाळी 9.00 वा. पासून ते दि.22 जून 2023 रोजीचे दुपारी 13.00 वा. पर्यंत लोणंद येथून फलटणकडे जाणारी वाहतूक आदर्की मार्गे फलटणकडे वळविण्यात येत आहे.
4) दि. 17 जून 2023 रोजीचे रोजीचे 00.00 ते दि.21 जून 2023 रोजीचे 24.00 वा.पर्यंत फलटण ते लोणंद या मार्गांवरील वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे.
5) दि.21 जून 2023 रोजीचे रोजीचे 00.00 पासून ते दि.23 जून 2023 रोजीचे 16.00 वा. पर्यंत फलटण ते नातेपुते जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे.
6) दि. 21 जून 2023 रोजीचे 00.00 वा. पासून ते दि.23 जून 2023 रोजीचे 24.00 वा. पर्यंत नातेपुते कडून पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक माळशिरस, अकलूज, बारामती पुल येथून बारामती मार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे.
7) दि. 21 जून 2023 रोजीचे 00.00 पासून ते दि.23 जून 2023 रोजीचे 16.00 वा. नातेपुते कडून फलटण मार्गे साताराकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणे मार्गे दहीवडी -सातारा अशी वळविण्यात येत आहे. नातेपुतेकडून पुण्याकडे जाणारी वाहतुक नातेपुते-दहीगाव-जांब- बारामती मार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे.
8) दि. 21 जून 2023 रोजीचे 00.00 पासून ते दि.23 जून 2023 रोजीचे 14.00 वा पर्यंत नातेपुते-वाई-वाठारकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणे-शिंगणापुर-जावली-कोळकी- झिरपवाडी-विंचुर्णी-ढवळपाटी-वाठार फाटा मार्गे वळविण्यात येत आहे.
9) दि. 22 जून 2023 रोजी पालखी सोहळा हा फलटण येथून पुढील बरड येथील मुक्कामी सकाळी 6.00 वा. मार्गस्थ होणार आहे. सदर वेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये म्हणून पालखीतील वाहने फलटण ते पंढरपूर रोडने बरडकडे जाण्याऐवजी फलटण-दहीवडी चौक- कोळकी- शिंगणापूर-तिकाटणे-वडले-पिंप्रद-बरड अशी वळविण्यात येत आहे.
पालखी सेाहळा दरम्यान पालखी मार्गावरील पालखी सोहळयातील वाहनाखेरीज इतर सर्व वाहने पर्यायी मार्गाने ये- जा करतील याची इतर वाहन धारकांनी नोंद घ्यावी.