शिवसमर्थचे नितीन पाटील यांना स्टार आयकाॅन पुरस्कार

कराड | महाराष्ट्र जर्नालिस्ट फौडेशन आणि भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्क यांच्या वतीने देण्यात येणारा मानाचा स्टार आयकॉन पुरस्कार शिवसमर्थ बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्सचे नितीन पाटील यांना डॉ. आण्णासाहेब डांगे, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, सदाभाऊ खोत, सम्राट महाडीक, डॉ. राजीव लोहार व अन्य मान्यवर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अँड. जनार्दन बोत्रे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शिवसमर्थ बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स तळमावलेच्या माध्यमातून अल्पावधीतमध्ये उद्योग क्षेत्रात नावारुपास येणारे आदर्श युवा उद्योजक म्हणून नितीन पाटील यांनी आपली बांधकाम क्षेत्रात सातत्याने नवनवीन उपक्रम राबवून नितीन पाटील यांनी आपली कार्यसिध्दता दर्शवली आहे. उद्योगाचे माध्यमातून अनेक युवकांना रोजगाराची साधने उपलब्ध करुन त्यांच्या जीवनमानाचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. सातारा जिल्ह्यासह विविध परिसरात पाटील यांनी आदर्श उद्योजक म्हणून जनमानसात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
यावेळी रमेश पाटील, आशीष थोरात, विकास शिरसट, उत्तम धर्मे, अक्षय पाटील व अन्य उपस्थित होते. बीबीएल मराठी न्यूज, महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन आणि भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्क स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नितीन पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.