ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

सातारा जिल्ह्यात गावागावात युवक काँग्रेसची बांधणी करणार : जिल्हाध्यक्ष राहूल पवार

सातारा :- छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती युवक काँग्रेसच्या वतीने सातारा काँग्रेस कमिटी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सुचनेनुसार सातारा जिल्हा युवक काँग्रेसची कार्यकारिणी बैठक जिल्हाध्यक्ष राहूल पवार नेतृत्वाखाली पार पडली. सातारा जिल्ह्यात युवक काँग्रेसची मजबूत बांधणी गावागावात खेड्यापाड्यात करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राहूल पवार यांनी सांगितले.

या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सहप्रभारी शांभवी शुक्ला आणि प्रदेश युवकचे सचिव प्रशांत गायकवाड, शिवाजी विद्यापीठचे सिनेट सदस्य अमित जाधव, प्रदेश सचिव प्राची ताकतोडे, जिल्हा उपाध्यक्ष समीर इनामदार तसेच सर्व विधानसभा अध्यक्ष व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी संघटनात्मक पातळीवर चर्चा झाली आणि नवीन पदाधिकाऱ्यांना निवड पत्र देण्यात आले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close