Hello News 2026 Ganpati Arati Book
कोल्हापूरक्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमुंबईराज्यसांगलीसातारा

मिरज लोहमार्ग पोलीसांची कारवाई : धावत्या रेल्वेतून चेन स्नेचिंग करणारा गजाआड

सांगली :- दादर वरून हुबळीला निघालेली गाडी नंबर 17318 मधून मिरज रेल्वे स्टेशन प्लॅटफार्म नंबर 1 आली असता प्रवासी महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावून चोरटा पळाला होता. तब्बल 15 दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर धाराशिव जिल्ह्यातून संशयित चोरट्यास अटक करण्यात मिरज लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दादर ते हुबळी रेल्वेतून महिला प्रवाशी शितल पाटील व त्यांचे नातेवाईक मिरज ते बेळगांव असा प्रवास करत असताना चालू गाडीतून एस 3 बोगीच्या खिडकीतून हात घालून अनोळखी चोरट्याने 30 ग्रॅमची वजनाची सोन्याची चैन हिसका मारुन तोडून चोरुन घेवून गेलेला होता. सदर बाबत गुन्हा रजि. नंबर 28/2026 बी.एन. एस. कलम 304, 304 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

मिरज लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व आरोपीचे रेकॉर्ड तपासून मिरज रेल्वे पोलीस ठाणे कडील प्रभारी अधिकारी सुभाष मुंढे, सहा. पोलीस निरीक्षक तसेच पोलीस उपनिरीक्षक नंदीनी मोहिते, पो. हवा. तौफिक पटेल, पो.हवा. अमर सावंत पो. हवा. मौसिन पटेल, पो. शि. अन्सार मुजावर पो. शि. अनिल घोलप, चालक विकास कदम व इतर सर्वानी मिळून 15 दिवस आरोपीचा शोध घेवून सांगली व कोल्हापुर तसेच भूम परंडा जि. धाराशिव पर्यत आरोपीचा शोध घेवून अट्टल गुन्हेगार उत्तम राजाराम बारड (वय 33 वर्षे, रा. धामोड ता. राधानगरी जि. कोल्हापूर) यास बेड्या ठोकल्या. या गुन्हेगारावर 25 पेक्षा जास्त जबरी चोरी, घरफोडी चे गुन्हे कोल्हापूरातील साधारण प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये दाखल आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close