ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यशैक्षणिकसातारा
कराडच्या कोटा अकॅडमीचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश


कराड ः- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे नुकत्याच घोषित झालेल्या इयत्ता ८ वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत येथील नामांकित कोटा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. भूषण सोमनाथ मोरे याने ३०० पैकी २५० गुण मिळवले तर देवयानी सतीश लावंड हिने २२२ गुण, आदिती चंद्रहस्त पवार हिने २२० गुण आणि अक्षरा धनंजय नरुले हिने १८४ गुण प्राप्त करत या प्रतिष्ठेच्या परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे.
या दैदिप्यमान यशाबद्दल अकॅडमीचे संचालक डॉ. महेश खुस्पे, संचालिका सौ. मंजिरी खुस्पे आणि मैथिली खुस्पे यांनी सर्व गुणवंत
विद्यार्थ्यांचा गौरव करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. या सत्कार सोहळ्याप्रसंगी प्राचार्या जयश्री पवार यांच्यासह
अकॅडमीतील सर्व शिक्षक आणि शिक्षकतेतर कर्मचारी उपस्थित होते.



