kota acadamy karad
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनराज्यसातारासामाजिक

आपत्ती काळात प्रशासन तुमच्या सोबत ः- सोपान टोंम्पे

कोयनानगरला आपत्ती व्यवस्थापन शिबीर

पाटण- सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व यशदा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने उपविभागीय अधिकारी सोपान टोंम्पे, तहसीलदार अनंत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन शिबिर 2026 आयोजित करण्यात आले. जि.प. प्राथ. शाळा कोयनानगर येथे शिबिर पार पडले.

यावेळी यशदा पुणेचे ट्रेनर लखन गायकवाड व अक्षय चव्हाण यांच्याकडून उपस्थित सर्वांना आपत्तीच्या वेळी घ्यावयाची काळजी, प्रथमोपचार, आपत्तीपूर्वी काय करावे. आपत्तीच्या काळात नागरिकांस कसे सहकार्य करावे. रेस्क्यू करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी सोपान टोंम्पे म्हणाले, आपल्या तालुक्यात पावसाचे प्रमाण नेहमीच जास्त असते. त्यामुळे अनेकदा आपत्तींना सामोरे जावे लागते. डोंगर दऱ्यात असलेल्या आपल्या भागात आपत्ती आल्यानंतर प्रशासन तुमच्या सोबत असतेच. परंतु, सामान्य लोकांनाही आपत्ती काळात काळजी घेणे गरजेचे असते. तेव्हा या प्रशिक्षण शिबिराचा प्रत्येकाला फायदा होईल, यात शंका नाही.

यावेळी हेळवाक मंडल मधील सातारा जि. प. सदस्य अशोक पाटील, शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, पोलीस उपनिरीक्षक कोयनानगर ओलेकर, भारतीय जनता पक्ष पाटण तालुका अध्यक्ष नंदकुमार सुर्वे, सरपंच चंदाताई कदम, निता इंगळे, लक्ष्मण येडगे, रामचंद्र सपकाळ, बाळासाहेब कदम, सावळाराम लाड, सत्यजित शेलार, लहूराज कदम, महादेव येडगे, अजय देसाई, वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक आनंद चाळके, चंद्रकांत पोतदार, संजय कुंभार, पोलीस विभागातील सर्व कर्मचारी, होमगार्ड, महसुल विभागातील सर्व कर्मचारी, ग्रामसेवक अधिकारी, पोलीस पाटील, आरोग्य विभागाचे कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते .

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close