kota acadamy karad
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

मध्यरात्री अपघात : सातारा- रहिमतपूर रोडवर इनोव्हा गाडीतून महिला बाहेर फेकल्याने जागीच मृत्यू

सातारा :- सातारा-रहिमतपूर रोडवर तासगाव जवळ बुधवारी मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला असून या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की ईनोवा गाडीची मागील काच फुटून महिला बाहेर फेकली गेली आणि गाडीच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातादरम्यान ईनोवा गाडीची मागील काच फुटल्याने एक महिला वाहनाबाहेर फेकली गेली. त्यानंतर गाडीच्या चाकाखाली आल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तत्काळ मदतकार्य हाती घेत मृत महिलेचा मृतदेह वाहनातून आणि अपघातग्रस्त स्थितीतून बाहेर काढला.

या भीषण अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. जखमींना उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close