Hello News 2026 Ganpati Arati Book
कोल्हापूरताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रबॉलिवूडराज्यसांगलीसातारा

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक : वसंतगडचे वासू पाटील विजयी, गायक आनंद शिंदे घरी

कराड : – अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या 2026 ते 2031 संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलने सर्वच्या सर्व 14 जागांवर विजय मिळवला आहे. या संचालक मंडळात कराड तालुक्यातील वसंतगड येथील प्रवीण उर्फ वासू पाटील यांनी कलादिग्दर्शक विभागातून तब्बल 885 मत घेऊन संचालक मंडळात 30 वर्ष संचालक असलेल्या प्रसिद्ध कलादिग्दर्शक सतीश बिडकर यांचा पराभव केला. कलादिग्दर्शक वासू पाटील यांच्या या विजयानंतर प्रसिध्द गायक आनंद शिंदे सहकुटुंब वसंतगड येथील निवासस्थानी भेट देवून सत्कार केला.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ही निवडणूक म्हणजे एका तालुक्याची एका जिल्ह्याची किंवा एका विभागाची नव्हती तर संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, बेळगाव आणि गुजरात राज्यातील मतदार असलेली निवडणूक होती. या निवडणुसाठी एकूण मतदार संख्या 60 हजारांच्या घरात असून भालजी पेंढारकर यांच्या प्रेरणेतून असंख्य जुन्या चित्रपट कर्मींनी उभारली आहे. या निवडणुकीसाठी मेघराज भोसले, सुशांत शेलार यांनी प्रचंड मेहनत घेतल्याने समर्थ पॅनेलचा विजय झाला आहे.

प्रवीण उर्फ वासू पाटील म्हणाले, माझ्या कला दिग्दर्शक विभागात असणाऱ्या कामगारांचे, कला जोपासणासाठी अहोरात्र झटणाऱ्या सहकाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावायचे आहेत. कामगारांचा असणारा आरोग्य, विमा योजना, वृद्ध कामगारांची पेन्शन योजनावर मी आता पहिल्यांदा भर देणार आहे. माझ्या विभागासह इतर विभागांमध्ये जे तंत्रज्ञान काम करतात, त्यांचा मानसन्मान वाढवण्याचे पहिलं काम मी या माध्यमातून करणार आहे.

वासू पाटील यांच्या विजयासाठी रोहित चव्हाण, संजय पाटील, जुगल किशोर ओझा, साताऱ्याचे दीपक देशमुख, संदीप भाऊ शिंदे यांच्यासह अनेकांनी मदत केली. वासू पाटील यांच्या विजयाबद्दल सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, कराडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, रिल स्टार रवि सुर्यवंशी, दिपक शिंदे, प्रसाद देशपांडे, श्री. गिरी, ग्रामसेवक प्रमोद ठोके, अभियंता प्रवीण चिंचकर, कराड उत्तर बांधकाम अभियंता प्रविण कोकरे, सामाजिक कार्यकर्ते सुनील बामणे यांच्यासह राज्यातील अनेक रंगकर्मी, राजकीय, सामाजिक हिंतचिंतकांनी शुभेच्छा देवून अभिनंदन केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close