कराडच्या वीरपुत्राला कर्तव्य बजावताना वीरमरण : मुलाच्या पहिल्या वाढदिवसाचे स्वप्न अपूर्ण

दिल्ली – सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या स्फोटात कराड तालुक्यातील शहापूर येथील जवान अर्जुन राजेंद्र जाधव हे शहिद झाले आहेत. या दुर्घटनेत आणखी एका जवानालाही वीरमरण आले आहे. देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना अर्जुन जाधव यांनी सर्वोच्च बलिदान दिल्याने शहापूर गावासह संपूर्ण कराड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
आर्जून चव्हाण यांच्या पश्चात पत्नी सायली, आई- वडिल, 11 महिन्याचे बाळ सर्वेश, दोन भाऊ आणि एक बहिण असा परिवार आहे. आर्जूनचा धाकटा भाऊ इंडियन नेव्हीमध्ये आहे. आर्जून आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसासाठी 15 दिवसानी येणार होता. 25 जूनला मुलाला एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, त्याअगोदरच चिमुकल्याचा बाबा शहिद झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
आर्जूनचे आई वडिल शेतकरी असून सर्व सामान्य कुटुंब आहे. आर्जूनच्या निधनाची बातमी शहापूर समजल्यानंतर गावावर तसेच परिसरावर शोककळा पसरली आहे. शहिद जवार आर्जून याचे पार्थिव शहापूर गावी शुक्रवारी येणार असल्याची माहिती समोर येत आहे.



