ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रबिझनेसराज्यसातारा

नरेडको कराडच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

कराड : नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (NAREDCO) कराडच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे प्रमुख उपस्थित होते. तसेच भारत सरकारच्या सल्लागार समितीचे सदस्य ॲड. डॉ. अमर मुल्ला हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी नारेडको कराडच्या २०२६ ते २०२८ या कालावधीसाठीच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा पार पडला. यामध्ये अरविंद बी. खाबळे यांनी चेअरमन पदाची, सुभाष एम. लोंढे यांनी अध्यक्ष पदाची, रमेश बी. पाटील यांनी सचिव पदाची, उदय डी. जाधव यांनी उपाध्यक्ष पदाची तर रविराज एस. शिंदे यांनी खजिनदार पदाची जबाबदारी स्वीकारली. तसेच संचालक म्हणून सुहास जाधव, विक्रम घारे, मच्छिंद्र कुंभार, विजयकुमार जगताप, मुनाफ वायकर, मंदार जोशी, प्रशांत मोहिते, धनंजय येडगे, प्रकाश पाटील आणि संताजी पाटील यांची निवड करण्यात आली.

नारेडको नेक्स्टजेन कराडच्या अध्यक्षपदी पंकज बागल तर नारेडको माही कराडच्या अध्यक्षपदी गीतांजली थोरात यांनी पदभार स्वीकारला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा देत कराडच्या रिअल इस्टेट क्षेत्राच्या विकासासाठी नारेडकोने पुढील काळात अधिक प्रभावीपणे कार्य करावे, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमास नारेडको कराडचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि बांधकाम क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close