kota acadamy karad
कृषीकोल्हापूरताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

700 म्हैशी : कापीलच्या युवा उद्योजक भाऊसाहेब ढेबे-पाटील यांच्या ‘भूमियुग’ म्हैसपालन प्रकल्पास आमदार विनय कोरे यांची सदिच्छा भेट

कराड (हॅलो न्यूज) : –  कापील येथील श्रीकल्पवृक्ष उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा उद्योजक भाऊसाहेब ढेबे-पाटील यांनी उभारलेल्या ‘भूमियुग’ या आधुनिक 700 म्हैसपालन प्रकल्पास जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार विनयजी कोरे सावकार यांनी सदिच्छा भेट देत प्रकल्पाची सविस्तर पाहणी केली. आधुनिक तंत्रज्ञान, नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून उभा राहिलेला हा प्रकल्प ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार यावेळी आमदार कोरे सावकार यांनी काढले.

प्रकल्पाची पाहणी करताना आमदार विनयजी कोरे सावकार यांनी म्हैसपालनातील आधुनिक सुविधा, जनावरांची निगा, चारा व्यवस्थापन, स्वच्छता, दूध उत्पादनाची प्रक्रिया तसेच व्यवसायाचे नियोजन याबाबत माहिती घेतली. कमी कालावधीत भाऊसाहेब ढेबे-पाटील यांनी उभा केलेला उद्योग पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

karad kapil dhebe patil Farm MLA Visit

यावेळी बोलताना आमदार विनयजी कोरे सावकार म्हणाले, “यश सहज मिळत नाही. त्यामागे अथक परिश्रम, जिद्द, सातत्य आणि दूरदृष्टी आवश्यक असते. भाऊसाहेब ढेबे-पाटील यांनी शून्यातून विश्व निर्माण करून ग्रामीण भागातील युवकांसमोर एक आदर्श उभा केला आहे. शेतीसोबत पूरक व्यवसाय उभारल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढू शकते. त्यामुळे युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योग आणि शेतीपूरक व्यवसायाकडे वळणे ही काळाची गरज आहे.”

यावेळी आमदार कोरे सावकार यांनी भाऊसाहेब ढेबे-पाटील यांच्या संघर्षमय प्रवासाचे विशेष कौतुक केले. अनेक अडचणी, संकटे आणि आर्थिक आव्हानांवर मात करत त्यांनी श्रीकल्पवृक्ष उद्योग समूहाची यशस्वी उभारणी केली असून, हा प्रवास नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रसंगी युवा उद्योजक भाऊसाहेब ढेबे-पाटील यांनी आमदार विनयजी कोरे सावकार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी भाऊसाहेब ढेबे-पाटील यांच्या मातोश्रीही उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मुलाच्या संघर्षमय प्रवासातील आठवणींना उजाळा देत, कठीण परिस्थितीतही खचून न जाता सातत्याने मेहनत केल्यामुळेच आज हे यश मिळाल्याची भावना व्यक्त केली. भेटीदरम्यान उद्योग समूहाच्या भविष्यातील विस्तार योजनांबाबतही चर्चा झाली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close