Hello News 2026 Ganpati Arati Book
कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनराजकियराज्यसातारा

कराड उत्तरच्या सह अध्यक्षपदी रणजित आप्पा पाटील : बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना

आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते सत्कार

कराड :- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गठित केलेल्या समितीच्या सह अध्यक्षपदी वडगावचे माजी सरपंच, उपाध्यक्ष भाजपा कराड उत्तर, सरपंच परिषदेचे कार्याध्यक्ष रणजित पाटील यांची निवड करण्यात आल्याने भाजपचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना म्हणून ज्याकडे पाहिले जातात ती योजना म्हणजे ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते’ ही योजना अधिक सक्षम करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्येक मतदारसंघात सहअध्यक्षांची नियुक्ती केली आहे. त्यात कराड उत्तर मधून वडगावचे रणजित पाटील यांची वर्णी लागली आहे.

या निर्णयामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामात समन्वय वाढून योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल. तसे पहिले तर राज्य शासनाने एकूण 91 विधानसभा क्षेत्रामध्ये सहअध्यक्ष यांची नेमणूक केली आहे. त्यात प्रामुख्याने सह अध्यक्षपदी विधान परिषद आमदार, माजी आमदार असे एकूण 16 आमदार आहेत. आजी माजी, जिल्हा परिषद सदस्य, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अशा लोकप्रतिनिधी, सामाजिक, राजकीय वजनदार व्यक्तीची निवड केली आहे. त्यात कराड उत्तर मधून आमदार मनोजदादा यांनी त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते रणजित अप्पा पाटील यांना काम करण्याची संधी दिली.

रणजित आप्पा हे वडगाव मधून प्रतिष्टीत राजकीय घराण्यातील आहेत. त्याचे आजोबा गावचे पंधरा वर्ष सरपंच होते. वडील स्वर्गीय ऍड. विनायकराव पाटील हे जुने उच्च विद्या विभूषीत, LLM कायदा तज्ञ होते. रणजित आप्पा स्वतः 2015 ते 2020 पर्यंत सरपंच होते. त्यानी त्यांच्या सरपंच पदाच्या काळात वडगाव गावचा सर्वांगीण विकास केलेला आहे. कोट्यावधी रुपयांची विकासकामे त्याना साकरण्यात यश आले आहे. शेत रस्ता, पाणंद रस्ता या समस्या त्यांना अवगत आहेत. त्यांची वडगांव गावावर मजबूत पकड आहे. गेली चाळीस वर्षे विकास सेवा सोसायटीवर त्याच्या विचाराच्या गटाचे वर्चस्व आहे. महसूल विभागाने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असून यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार रस्त्यांचा लाभ लवकर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close