तळमावले येथे उद्या ‘शिवसमर्थ मल्टिस्टेट’चा वर्धापनदिन सोहळा : 1 टक्का जादा व्याज मिळणार
भव्य रक्तदान व मोफत सर्वरोग आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

सातारा (हॅलो न्यूज):- महाराष्टातील अग्रगण्य वित्तीय संस्था म्हणून नावाजलेल्या ‘शिवसमर्थ मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि; तळमावले’ चा वर्धापनदिन सोहळा शनिवारी (दि. १५ ऑगस्ट) अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. वर्धापनदिनाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध धार्मिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष ॲड. जनार्दन लक्ष्मण बोत्रे यांनी दिली आहे.
मुदत ठेवींवर १ टक्के जादा व्याजदर
वर्धापनदिनाचे औचित्य साधून संस्थेने ठेवीदारांसाठी एक विशेष योजना जाहीर केली आहे. १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६ या एक महिन्याच्या कालावधीत संस्थेत ठेवण्यात येणाऱ्या मुदत ठेवींवर (Fixed Deposits) नेहमीपेक्षा १ टक्के जादा व्याजदर दिला जाणार आहे. या सुवर्णसंधीचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा.
भव्य रक्तदान शिबीर
शिवसमर्थ मल्टिस्टेट आणि बालाजी ब्लड सेंटर, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या रक्ताची भासणारी गरज लक्षात घेता, तरुणांनी व नागरिकांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे.
मोफत सर्वरोग आरोग्य तपासणी शिबीर
शिव आरोग्य सेवा मल्टि स्पेशालिटी को-ऑप. हॉस्पिटल ॲंड रिसर्च सेंटर लि. यांच्या सहकार्याने ‘शिव आरोग्य सेवा हॉस्पिटल, तळमावले’ येथे मोफत सर्वरोग आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत हे शिबीर सर्वांसाठी मोफत खुले राहील. या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची मोफत तपासणी व योग्य तो सल्ला दिला जाणार आहे. तरी शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी मुख्य कार्यालयात श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व सभासद, ठेवीदार आणि नागरिकांनी या तीर्थप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.



