ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्यसातारा
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या चुलत बंधूचे निधन

कराड (हॅलो न्यूज): महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांचे चुलत बंधू तथा कुंभारगावचे सुपुत्र कै. अधिकराव अण्णासाहेब चव्हाण (पप्पू काका) यांचे सोमवार, दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्यावर कराड येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, नातेवाईक आणि मित्रपरिवार असा मोठा परिवार आहे.
कै. अधिकराव (पप्पू काका) चव्हाण यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी 9:30 वाजता वैकुंठ स्मशानभूमी, कराड येथे होणार आहे. नातेवाईक, मित्रपरिवार व नागरिकांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन चव्हाण कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.



