Shekar Patil Maqheshwari Infra 1
ताज्या बातम्याधार्मिकपश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

मसूरच्या ऐतिहासिक पाटील वाड्यात पालकमंत्री शंभूराज देसाई

मसूर (हॅलो न्यूज) :- स्वातंत्र्यपूर्व काळापासून ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि परंपरांनी नटलेल्या मसूर नगरीतील पंचक्रोशीचे श्रद्धास्थान असलेल्या पाटील वाड्यातील मानाच्या गणपतीचे दर्शन पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी घेतले. यावेळी त्यांनी या गणेशोत्सवाच्या प्राचीन परंपरेची माहिती दिली. मसूर येथील पाटील वाड्यातील गणेशोत्सवाची प्रथा पेशवाई काळातील असून, ती १७३२ पूर्वीपासून सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

ऐतिहासिक पाटील वाड्यातील मानाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेली अनेक वर्ष पालकमंत्री शंभूराज देसाई हे हजेरी लावत असतात. यावर्षीही त्यांनी मसूर येथे पाटील वाड्यातील मानाच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी जगदाळे देशमुख परिवारातील मानसिंगराव जगदाळे यांनी त्यांचे पाटीलवाडा गणेश उत्सवाच्या वतीने स्वागत केले. यावेळी माजी अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, परिवारातील जेष्ठ गोविंदराव जगदाळे, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे, माजी उपसरपंच विजयसिंह जगदाळे, वि.से. सोसायटीचे चेअरमन शहाजीराव जगदाळे, महेश जगदाळे, सुरेश जगदाळे, मनोज जगदाळे, संग्रामसिंह जगदाळे, प्रदीप जगदाळे आदींसह परिवारातील सदस्य उपस्थित होते.

मसूरच्या या ऐतिहासिक गणेशोत्सवाला पंचक्रोशीत विशेष महत्त्व आहे. पाटील वाड्यातील गणपती हा भक्तांचे श्रद्धास्थान असून, या उत्सवाच्या माध्यमातून परिसरातील सांस्कृतिक वारसा जपला जातो. पालकमंत्र्यांनी यावेळी स्थानिक परंपरा आणि इतिहासाचे महत्त्व अधोरेखित केले. गणेशोत्सवाच्या या प्रथेला सुमारे तीनशे वर्षांहून अधिक काळ लोटला असून, ती आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने साजरी केली जाते. दर्शनानंतर शंभूराज देसाई यांनी उपस्थितांशी संवाद साधला. मसूरच्या या गणेशोत्सवामुळे परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close