Shekar Patil Maqheshwari Infra 1
Uncategorized

कराडला पहाटे 3 वाजता अतिक्रमणावर बुलडोझर : प्रशासनाचा अतिक्रमणावर हातोडा

कराड (हॅलो न्यूज) :- कराड- चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर वारुंजी फाटा येथे गेल्या अनेक वर्षापासून असलेल्या अतिक्रमणावर प्रशासनाने पहाटे तीन वाजता बुलडोजर चालवला आहे. वारूंजी फाटा येथे 2016 साली अतिक्रमण हटाव मोहीम केल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी उभारलेले व्यावसायिक खोकी धारकांचे अतिक्रमण महसूल प्रशासन, कराड पंचायत समिती प्रशासन आणि कराड शहर पोलीस या तिघांनी एकत्रित येत हटवण्यास सुरूवात केली आहे.

कराडच्या प्रशासनाकडून पहिल्यांदाच अशा प्रकारे कारवाई होत असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वारूंजी येथील गणेश मंदिराच्या समोरील बाजूला कराडच्या दिशेला येणाऱ्या जागेत 6 व्यावसायिक खोकी अनेक दिवसांपासून होती. त्यांना प्रशासनाकडून 15 दिवसापूर्वीच नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर आज पहाटे प्रशासनाने धडक कारवाई करत सर्व अतिक्रमण जमीनदोस्त केले आहे.

या कारवाईवेळी तहसिलदार कल्पना ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांच्यासह जवळपास 60 कर्मचारी उपस्थित होते. तसेच दोन जेसीबी आणि दोन ट्रॅक्टरच्या माध्यमातून केवळ 4 तासात सर्व अतिक्रमणावर हातोडा मारला आहे. यावेळी खोकी धारक व्यावसायिकांना माहिती मिळताच ते घटनास्थळी धावले होते, मात्र तोपर्यंत कारवाईने वेग घेतला होता. काही व्यावसायिकांनी आपले साहित्य ताब्यात घेतले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close